Bicholim: डिचोलीत ‘हेल्मेटधारी’ भामट्याचा धुमाकुळ! सुट्या पैशांच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लुबाडणूक; 15 जणांना लावला चुना

Helmet scam Bicholim: डिचोली बाजारात एका ''हेल्मेटधारी'' भामट्याचा वावर वाढला असून, सुट्या पैशांच्या बहाण्याने हा भामटा विक्रेत्यांना हातोहात चुना लावत असल्याची माहिती मिळाली आहे.
Helmet Man
HelmetDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Helmet Crime News

डिचोली: डिचोली बाजारात एका ''हेल्मेटधारी'' भामट्याचा वावर वाढला असून, सुट्या पैशांच्या बहाण्याने हा भामटा विक्रेत्यांना हातोहात चुना लावत असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यात या भामट्याने बाजारातील विक्रेते आणि दुकानदार मिळून जवळपास पंधराजणांना हातोहात गंडवले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

''हेल्मेट'' परिधान करुन येणारा हा भामटा विक्रेते किंवा दुकानदारांकडे जाऊन वस्तू किंवा सामान घेण्याचा बहाणा करुन दुकानदारांचा विश्वास संपादन करतो. नंतर ५०० रुपये सुटे द्या. बाजूच्या विक्रेत्याला देऊन येतो.

Helmet Man
Crime News: शेंगदाणे, पापडात लपवले चरस; कुरिअरद्वारे गोव्याला अमली पदार्थ पाठवण्याचा कट पोलिसांनी उधळला

असे सांगून जाणारा हा भामटा गायब होतो. ही व्यक्ती सामान न्यायला येणार आणि आमचे पैसे देणार. या प्रतीक्षेत असलेल्या विक्रेत्यांना अखेर कपाळावर हात मारण्याची पाळी येते. बाजारात बसणाऱ्या महिला विक्रेत्यांसह काही दुकानदारांना या भामट्याने दणका दिल्याची माहिती मिळाली आहे.

Helmet Man
Goa Crime: सासष्टीत ‘हाऊजी’च्या नावावर जुगार, लाखोंच्या बक्षिसांची उलाढाल; निर्देश नसल्याने पोलिस हतबल

पोलिसांनी सतर्क रहावे

बंदरवाडा येथील एक मिठाईवाला वीरू पटेल याला अलीकडेच या भामट्याचा वाईट अनुभव आला. विविध प्रकाराची चार हजार रुपयांची मिठाई बांधून ठेवा, असे सांगून हा भामटा या मिठाईवाल्याकडून हातोहात दोन हजार रुपये घेवून पळाला. अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी बाजारात गस्त वाढवून या भामट्याच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी मिठाईवाला पटेल याच्यासह दणका बसलेल्या अन्य व्यापाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com