Gomantak Young Inspirators Network : प्रतिभा आणि विवेकबुद्धी हीच आपली ताकद

रियाझ भरुचा : गोमन्तक-यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे झांट्ये महाविद्यालयात मार्गदर्शन
Gomantak Young Inspirators Network Program
Gomantak Young Inspirators Network Program Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : मनाला आकार नसतो, ते जमिनीवर पडणाऱ्या पाण्याप्रमाणे असते, ते चंचल असते. त्याला आकार देण्याचे काम आपलेच आहे. त्यासाठी आपली विवेकबुद्धी खूप महत्त्वाची आहे. ही विवेकबुद्धीच आपल्या आयुष्याला दिशा देते. आपल्याला ताण येणारच, पण आपण बुद्धिवादी असू, आपला विवेक जागृत असेल तर आपण त्यावर सहज मात करू शकतो. आपल्याकडे असणारी विवेकबुद्धी आणि आपली प्रतिभा हीच आपली खूप मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन वेदांता फाऊंडेशनचे सदस्य आणि प्रेरक वक्ते रियाझ भरूचा यांनी केले.

गोमन्तक - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे डिचोली येथील नारायण झांट्ये वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भरुचा पुढे म्हणाले, स्वधर्म आणि परधर्म याची व्याख्या समजून घेतली पाहिजे. आपण आपला स्वधर्म ओळखून आपले महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी - व्यवसायाचे नियोजन करायला हवे. मित्रांचे अथवा सहकाऱ्यांचे ऐकून आपण परधर्मानुसार वागायला लागलो, आपल्या आयुष्यातील निर्णय घेऊ लागलो तर चुकीच्या दिशेने वाटचाल होईल.

Gomantak Young Inspirators Network Program
जीपिसी कुडचडे येथे YIN करिअर मार्गदर्शन | YIN Career guidance at GPC Curchorem | Gomantak Tv

आपले मन कुठेही गुंतू शकते, कल्पना विश्वात रमू शकते परंतु त्याला बुद्धीची जोड असेल तर ते भरकटणार नाही. आपल्या शरीराला हे विचार आणि बुद्धीच कृती करायला भाग पाडते. त्यामुळे विचार सकारात्मक ठेवून आपल्या भविष्याकडे पाहायला हवे."कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण झांट्ये वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभारजुवेकर यांनी केले.

कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. राजेश आमोणकर, वेदांता फाऊंडेशनच्या सारिशा भरूचा, अंकित काणे, प्रा. नयना सैल आदी उपस्थित होते. आस्मि पानावलेकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.अनुराधा बांदिवडेकर यांनी आभार मानले.

व्याख्यानानंतर भरुचा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेदांता कल्चरल फाऊंडेशन च्या शैक्षणिक आणि अध्यात्मिक उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

Gomantak Young Inspirators Network Program
Dicholim: खोर्जुवे पदपूल मोडकळीस; नवीन पुलाचा प्रस्ताव

प्रेरणादायक विचार

सध्याचा काळ हा धावपळीचा आहे. त्यामुळे अभ्यासाचा, अडचणींचा मनावर ताण येणे स्वाभाविक आहे. पण अशा परिस्थितीत आपण मनाला शांत ठेवून आपल्या प्रगती कडे लक्ष दिले पाहिजे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क कायमच मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील अशा वक्त्यांचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करत असते. त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत असून त्यांनी हे काम असेच सुरु ठेवावे. भरुचा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वक्त्याचे विचार विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभारजुवेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com