Bicholim News : डिचोलीत २९ मार्चला शिमगोत्सव; चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य स्‍पर्धा

Bicholim News : आमदारांच्‍या अध्यक्षतेखाली विविध समित्‍यांची निवड
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोलीत यंदा येत्या २९ मार्च रोजी शासकीय पातळीवर शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाही चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यंदाचा शिमगोत्सव यशस्वी होण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती आणि विविध उपसमित्या निवडण्यात आल्या. काल शनिवारी आयोजन समितीचे अध्यक्ष तथा डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिमगोत्सव मिरवणूक आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी सरचिटणीस दिलीप धारगळकर, उपाध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दीपा पळ, दीपा शिरगावकर, मुळगाव सरपंच तृप्ती गाड, शेखर नाईक, शंकर बेतकीकर, रुद्रेश चणेकर, रोहिदास पळ, दीपक नानोडकर, गुरुदास गावडे आदी विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

Bicholim
Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

२९ रोजी सायंकाळी ५ वाजता शिमगोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. बोर्डे येथील श्री वडेश्‍‍वर देवाला नारळ ठेवल्यानंतर देवाच्या प्रांगणातून शिमगोत्सव मिरवणुकीला सुरूवात होईल. भायलीपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ येताच मिरवणुकीची सांगता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com