Garbage On Road : सीमेवरील कचऱ्याला वाली कोण? पालिका व पंचायतीचे दुर्लक्ष

Garbage On Road : ज्या ठिकाणी कचरा साचला आहे, तो परिसर डिचोली पालिका आणि कारापूर-सर्वण पंचायतीच्या सीमेवर येतो. त्यामुळे या कचऱ्याची उचल करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची यात स्पष्टता नसल्याने कचरा तुंबत चालला आहे.
BicholimGarbage On Road
BicholimGarbage On RoadDainik Gomantak

Garbage On Road :

डिचोली, रोलिंग मिल, वाठादेव परिसरात कचरा समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. डिचोली-वाठादेव दरम्यानच्या रस्त्यावरील रोलिंग मिल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे.

ज्या ठिकाणी कचरा साचला आहे, तो परिसर डिचोली पालिका आणि कारापूर-सर्वण पंचायतीच्या सीमेवर येतो. त्यामुळे या कचऱ्याची उचल करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची यात स्पष्टता नसल्याने कचरा तुंबत चालला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात रोलिंग मिल परिसरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. या प्रकाराविरोधात स्थानिकांनी आवाज काढताच, पालिकेने जेसीबी यंत्राद्वारे कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ केला होता.

त्यानंतर काही महिने या रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार बंद होते. आता पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्याने या परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. पालिका आणि पंचायतीच्या सीमेवर ही कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याने तो हटवण्यासाठी यापैकी कोणीच पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ही समस्या अधिक उग्र झाली आहे.

परिसरात दुर्गंधी

डिचोली-साखळी रस्त्याला जोडून मुस्लिमवाडा येथून वाठादेव-कुडचिरेला जाताना रोलिंग मिलसमोर रस्त्यालगत सध्या अस्वच्छतेचे दर्शन घडते. सध्या या परिसरात प्लास्टिक तसेच सुका आणि ओला कचरा साचला आहे.

ओल्या कचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी दाटून असते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना अक्षरशः नाक मुठीत धरण्याची वेळ येते. येथे भटके श्वान आणि गुरांचाही वावर वाढला आहे.

BicholimGarbage On Road
Goa News : जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष; कुठ्ठाळीच्या जाहीर सभेत युरी आलेमांव यांचे भाजपवर टीकास्त्र

जबाबदारी कोणाची?

कारापूर-सर्वण पंचायत आणि डिचोली पालिकेच्या हद्दीवर हा कचरा दाटलेला आहे. याचा त्रास दोन्ही सीमालगत राहणाऱ्या लोकांना होतो. मात्र हा कचरा हटवण्याकडे पंचायत तसेच पालिकाही याकडे दुर्लक्ष करते.

त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. या पूर्वी पालिकेने पुढाकार घेउन कचरा हटवला आहे. परंतु सध्या या कचऱ्याकडे कोणाचेच लक्ष नाही, त्यामुळे लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. पंचायत व पालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com