Bicholim Firecracker Sales Drop: डिचोलीत यंदाही फटाक्यांच्या विक्रीत घट, पावसाचा फटका: इको फ्रेंडली चतुर्थी साजरी करण्यावर भर
Bicholim Firecracker Sales DropDainik Gomantak

Bicholim Firecracker Sales Drop: डिचोलीत यंदाही फटाक्यांच्या विक्रीत घट, पावसाचा फटका: इको फ्रेंडली चतुर्थी साजरी करण्यावर भर

Ganesh Chaturthi 2024: चतुर्थीनिमित्त डिचोलीचा बाजार वेगवेगळ्या फटाक्यांनी फुलला असला, तरी यंदाही फटाक्यांना अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्याचे दिसून आले.
Published on

डिचोली: चतुर्थीनिमित्त डिचोलीचा बाजार वेगवेगळ्या फटाक्यांनी फुलला असला, तरी यंदाही फटाक्यांना अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्याचे दिसून आले. फटाक्यांच्या विक्रीत यंदा जवळपास ३५ ते ४० टक्के घट झाली असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा ऐन चतुर्थीत पावसाने कहर केल्याने फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. चार वर्षांपूर्वी फटाक्यांना समाधानकारक मागणी होती. मात्र ''कोविड'' महामारीनंतर गेल्या तीन वर्षांपासून फटाक्यांच्या मागणीत घट होऊ लागली आहे, असा विक्रेत्यांचा दावा आहे.

Bicholim Firecracker Sales Drop: डिचोलीत यंदाही फटाक्यांच्या विक्रीत घट, पावसाचा फटका: इको फ्रेंडली चतुर्थी साजरी करण्यावर भर
Bicholim Traffic: 'पोलिसांनी कडक कारवाई करावी!' वाहतूक कोंडी समस्येवरुन डिचोलीवासीयांची मागणी

चतुर्थी म्हटली, की फटाक्यांची आतषबाजी आलीच. एक काळ असा होता, की फटाके फोडल्याशिवाय चतुर्थी साजरी केली असे वाटतच नव्हते आणि चतुर्थीचा उत्साहही द्विगुणित होत नसे. मध्यंतरीच्या काळात तर गणेशभक्तांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीची स्पर्धाही वाढली होती. मात्र प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून इको फ्रेंडली चतुर्थी साजरी करण्यासाठी अधिकाधिक गणेशभक्तांचा कल वाढू लागला आणि हळूहळू फटाक्यांचा वापर कमी होत गेला. तरीदेखील ग्रामीण भागात आजही फटाके फोडल्याशिवाय चतुर्थी साजरीच होत नाही. असे चित्र दिसून येत आहे. बुधवारी (ता. ११) डिचोलीतील बहूतेक भागात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनापूर्वी बुधवारी काही गणेशभक्तांनी फटाके खरेदी केली. मात्र पूर्वीसारखा उत्साह दिसून येत नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com