Mango Cultivation : यंदा कच्च्या कैऱ्या झाल्या ‘आंबट’; प्रमाण घटले

Mango Cultivation : असंतुलित हवामानामुळे आंबा लागवडीवर परिणाम
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Mango Cultivation :

डिचोली, यंदा कच्च्या कैऱ्या ‘आंबट’ होण्याचे संकेत मिळत असतानाच आता बाजारात कैऱ्यांची आवक वाढू लागली आहे. बुधवारी येथील आठवडी बाजारात कैऱ्यांची आवक वाढली होती.

आवक वाढली असली, तरी कैऱ्या मात्र अजूनही महागच आहेत. ४०० ते ६०० रुपये शंभर नग असे कैऱ्यांचे दर आहेत.

यंदा मार्च महिना संपूनही गेल्या आठवडी बाजाराच्या दिवसांपर्यंत डिचोलीत अपेक्षेप्रमाणे कच्च्या कैऱ्यांची आवक झालेली नव्हती. गेल्या दोन-तीन आठवडी बाजारात काही भागातून कच्च्या कैऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या होत्या.

Bicholim
Heatwave Alert In Goa: काळजी घ्या! पुढचे सात दिवस सूर्य आग ओकणार, गोवा सरकारची ॲडव्हायझरी प्रसिद्ध

मात्र त्याचे प्रमाण फारच कमी आणि त्या महाग होत्या. आहारातील एक घटक असलेल्या कच्च्या कैऱ्यांना मोठी मागणी असते.

खळात घालणे वा लोणच्यासाठी कैऱ्यांना मागणी असते. मात्र यंदा कच्च्या कैऱ्यांचे प्रमाण घटल्याने त्यातच त्या महाग झाल्याने अनेकांना जिभेला लगाम घालावा लागणार आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कच्च्या कैऱ्यांची आवक होण्याची शक्यता असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कैऱ्यांचे प्रमाण कमी राहणार, असे संकेत मिळत आहेत.

सीमेलगतच्या भागातून कैऱ्या

महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागातून कच्च्या कैऱ्या आज डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. गावठी कैऱ्या ४०० रुपये, तर कर्नाटक भागातून उपलब्ध झालेल्या कैऱ्या ५०० ते ६०० रुपये शंभर नग या दराने विकण्यात येत होत्या.

असंतुलित हवामानामुळे यंदा आंबा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या कैऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील आठवड्यात कैऱ्यांची आवक वाढणार, असे माटणे येथील एक विक्रेते पुनाजी गवस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com