Bicholim E-Waste Collection: जुन्या कपड्यांसह ई-कचरा संकलन; जनतेकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

जनतेकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; 4 जूनपर्यंत स्‍वीकारणार वस्‍तू
E-Waste Collection
E-Waste Collection Gomantak Digital Team

Bicholim E-Waste Collection: डिचोली पालिकेतर्फे जुने कपडेलत्ते, ई-वेस्ट आदी वापराविना पडून असलेल्या वस्तू गोळा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काल शनिवारी या उपक्रमाला प्रारंभ झाला असून 4 जूनपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कपडे आदी वस्तू जमा झाल्या.

‘जी-सुडा’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

E-Waste Collection
Bicholim Amthane Dam : मगरींमुळे आमठाणे धरण पर्यटनासाठी बनले असुरक्षित

शनिवारी येथील बाजारातील गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मंडपात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, जी-सुडाचे संचालक नारायण बेतकीकर, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, दीपा पळ आणि दीपा शिरगावकर यांच्यासह डॉ. कौस्तुभ पाटणेकर तसेच जी-सुडा आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

E-Waste Collection
Bicholim : धबधबा खाण खंदकातील पाणीउपसा सुरू

यावेळी बोलताना कुंदन फळारी आणि सचिन देसाई यांनी जनतेने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि प्रा. समीर प्रभू यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना पर्यावरणाच्यादृष्टीने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे म्हटले आहे.

स्‍तुत्‍य उपक्रमामागील संकल्पना

‘रेड्युस, रियुज आणि रिप्लेस’ या संकल्पनेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्‍याअंतर्गत जमा होणारे कपडे आदी वस्तू निवडण्यात येणार आहेत. वापरण्यालायक असलेले कपडे गरजू लोकांना देण्यात येतील.

E-Waste Collection
Bicholim Fish Market: परप्रांतीय सुकी मासळीविक्रेत्‍यांची संख्‍या वाढली

अन्य वस्तू कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेऊन त्यावर रिसायकलिंग करण्यात येणार आहे. जुने कपडे काहीजण अस्ताव्यस्त टाकतात. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत गणेशोत्‍सव मंडपात विविध वस्तू स्वीकारण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com