Bicholim: डिचोलीत दिवाळीची लगबग; गावठी पोहे, आकाशकंदिलांची रेलचेल, कारीटेही दाखल; मिठाईची दुकानेही सजली

Bicholim Market: दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या असून, गावठी पोह्यांसह गोड-तिखट पोहे, चकली, शंकरपाळी, लाडू, चिवडा आदी दिवाळीचा फराळ आणि सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल होत आहेत.
Bicholim Market
Bicholim MarketDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या असून, गावठी पोह्यांसह गोड-तिखट पोहे, चकली, शंकरपाळी, लाडू, चिवडा आदी दिवाळीचा फराळ आणि सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल होत आहेत.

बालगोपाळांसह सर्वांचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी तोंडावर आल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या सणाची लगबग सुरू झाली आहे. महिला स्वयंसाहाय्य गटांनी तयार केलेला फराळही बाजारात विक्रीस उपलब्ध झाला आहे. मिठाईची दुकानेही विविध प्रकारच्या मिठाईने सजू लागली आहेत. पुढील दोन दिवसात सर्व प्रकारची मिठाई बाजारात दाखल होणार आहे. अशी माहिती मिठाई दुकानदारांकडून मिळाली आहे.

दिवाळीच्या साहित्य खरेदीला अजून म्हणावा तसा जोर आलेला नाही. मात्र, पुढील दोन दिवसांत दिवाळीचा बाजार फुलून खरेदीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्याबाजूने दिवाळीवर पावसाचे सावट असल्याने विक्रेते काहीसे चिंतेत आहेत. आज (बुधवारी) दुपारी विजेच्या सौम्य गडगडाटासह काही प्रमाणात पावसाची बरसातही झाली.

एक काळ असा होता, की बहुतेक भागात गावठी भातापासून पोहे कांडण्यात येत होते. हा प्रकार कालबाह्य झाला असला, तरी अजूनही दिवाळीला गावठी पोह्यांना मागणी आहे.

Bicholim Market
Goa Former CM Ravi Naik Dies : माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

बाजारी पोह्यांसह गावठी पोहे डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. १०० ते १२० रुपये किलो असे गावठी पोहे, तर फुलविलेले पोहे १२० रुपये किलो, असे पोह्यांचे दर आहेत. बाजारातील बहुतेक सर्व भुसारी (किराणा) दुकानांत गावठी पोहे उपलब्ध असले, तरी काही विक्रेत्यांनी बाजारात पोहे विक्रीचे स्टॉल थाटले आहेत.

गावठीसह बाजारी पोह्यांनाही मागणी आहे. बाजारी पोह्यांचे दर ७० रुपये किलो असे आहेत. हळूहळू बाजारात खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे.

खानापूरच्या पणत्या दाखल

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. घरोघरी आकाशकंदील आणि पणत्या पेटवून दिवाळीचे स्वागत करण्यात येते. मातीकाम करणाऱ्या डिचोलीतील बहुतेक कलाकारांनी पणती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून डिचोलीच्या बाजारपेठेत राज्याबाहेरील पणत्यांची चलती झाली आहे.

Bicholim Market
Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

सध्या डिचोलीच्या बाजारात दोडामार्गजवळील ‘आयी’सह कर्नाटकातील खानापूर येथील पणत्या विक्रीस येऊ लागल्या आहेत. आकर्षक असे रेडिमेड आकाशकंदिल बाजारात उपलब्ध झाले आहेत. काही पारंपरिक कलाकारांनी आकाशकंदील सजवून ते बाजारात विक्रीस उपलब्ध केले आहेत. बाजारात कारीटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com