Bicholim News : देवस्थान समिती वैधच; बरखास्तीची मागणी निरर्थक

रमेश प्रभूंसह पदाधिकाऱ्यांचा दावा : प्रसिद्ध माल्याची जत्रा परंपरेनुसार व्हायला हवी
Devsthan Committee
Devsthan CommitteeGomantak Digital Team
Published on
Updated on

Bicholim News : मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानची माल्याची जत्रा साजरी करण्यास देवस्थान समितीने कोणतीही आडकाठी आणलेली नाही. उलट ही जत्रा परंपरेनुसारच व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

काही कुटुंबांनी देवस्थान समिती बरखास्तीची केलेली मागणी निरर्थक आहे. महाजनांनी निवडून दिलेली देवस्थान समिती कायदेशीर आणि अधिकृत आहे,असा दावाही देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश प्रभू, बाळकृष्ण प्रभू आणि महेश परब यांनी मयेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.श्री माया केळबाई देवस्थानला मोठा इतिहास आणि परंपरा आहे.

Devsthan Committee
Ram Navami 2023: रामनवमीला पूजा करतांना अशी घ्या काळजी

देवस्थान समिती कायदेशीर आणि सर्वमान्य असून, देवस्थान समितीकडून कोणतीच चूक झालेली नाही,असा दावाही देवस्थान समितीने करुन, देवस्थान समिती बरखास्तीची मागणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, आणि तसा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. मंगळवारी (ता.28) रात्री मये येथील श्री महामाया मंदिरात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस देवस्थान समितीचे अन्य पदाधिकारी आणि परब कुटुंबातील बांधव उपस्थित होते.

Devsthan Committee
Goa Economic Survey 2023 : विकासदरात 10.33 टक्के वाढ अपेक्षित : आर्थिक पाहणी अहवाल

देवस्थान समिती बरखास्त करावी, अशी मागणी नाईक गावकर, गावस, गोसावी आणि च्यारी कुटुंबीयांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने आपली बाजू स्पष्ट केली. नाईक गावकर, गावस, गोसावी व च्यारी गटाने केलेली मागणी हास्यास्पद आहे. प्रत्येक उत्सवावेळी वाद निर्माण होतात, त्याला देवस्थान समिती जबाबदार नाही, असेही देवस्थान समितीने म्हटले आहे.

Devsthan Committee
Goa Assembly Session 2023: आगामी विधानसभेपूर्वी एसटींना राजकीय आरक्षण : मुख्यमंत्री

चौगुले मंडळी सांगतील तशी जत्रा व्हावी !

महाजनकीचा दावा करणाऱ्या आणि प्रत्येक उत्सवावेळी वाद निर्माण करणाऱ्या कुटुंबांनी माल्याच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण केला आहे, असा आरोप देवस्थान समितीने केला आहे. माल्याच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर एक संयुक्त बैठक झाली होती.

या बैठकीस देवस्थानशी संबंधित मुळगाव, वायंगिणी, शिरगाव आणि डिचोली येथील चौगुले उपस्थित होते. या चौगुले मंडळीकडून देवस्थान प्रशासकांनी परंपरा जाणून घेतली आहे. चौगुले मंडळीनी कथन केलेल्या परंपरेनुसार जत्रा साजरी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असे देवस्थान समितीने स्पष्ट करून, प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com