Mahadayi Water Dispute : सत्तरीत 144 कलम लावणे दुर्दैवी; भूमिपुत्रांची टीका

शासन राजकीय दबावाखाली; व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात
Mahadayi Press
Mahadayi PressDainik Gomantak
Published on
Updated on

म्हादई नदीच्या रक्षणार्थ लढा देणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु काहींनी सत्तरी तालुका विकतच घेतलाय, असे चित्र निर्माण झाले आहे. म्हादईच्या बचावासाठी जनजागृती करीत असलेल्या आरजी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना पदयात्रा काढण्यास मनाई करणे, ही लोकशाहीचा खून करणारी घटना कोपार्डे, ठाणे येथे घडली आहे.

त्याचा आम्ही निषेध करीत असून काहीही गरज नसताना सत्तरीत 144 कलम लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टिका ‘म्हादई वाचवा सत्तरी वाचवा’ या बॅनरखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तरीतील भूमिपुत्रांनी केली आहे.

Mahadayi Press
Mapusa: अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, कुटुंबीय घराबाहेर असताना त्याने संधी साधली

हे 144 कलम मागे घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली जाईल. नाहीतर कोणालाच लढा देता येणार नाही. म्हणूनच सरकारने यात तत्काळ लक्ष घालून व्यक्तिस्वातंत्र्याला मोकळीक द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

वेळूस-सत्तरी येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला समाजकार्यकर्ते हनुमंत परब, रणजीत राणे, गौरीश गावस, ॲड. गणपत गावकर यांची उपस्थिती होती.

पदयात्रा रोखणे घटनाबाह्य

ॲड. गणपत गावकर म्हणाले, कोपार्डेत पदयात्रा रोखणे हे घटनाबाह्य आहे. यामुळे अधिकाराचे हनन केले आहे. त्याची चीड येते. दोन धर्मांमध्ये वाद निर्माण झाल्यास, जातीजातींत भांडणे झाल्यास, समाजात वाद असल्यास 144 कलम लावले जाते. परंतु सत्तरीत तसे काहीच घडलेले नाही. हे कलम बेकायदेशीरपणे लावले गेले आहे.

Mahadayi Press
अनोखी 'टिफिन फॅक्टरी'

"सत्तरी तालुक्यात म्हादई बचावसाठी येत असलेल्या विविध संघटनांचे नेहमीच स्वागत असणार आहे. आरजी पक्षाने पदयात्रेचे आयोजन करून म्हादई बचावसाठी चांगली भूमिका घेतली होती. पण काही लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर करून पदयात्रेला ब्रेक दिला. व 144 कलम लादण्यात आले आहे. अशाने सत्तरीत कोणालाच चळवळ उभी करता येणार नाही. एखादा आमदार सांगतो तसेच लोकांनी करायचे की काय? आता ग्रामीण भागात जनजागृती बैठकीद्वारे चळवळ केली जाणार आहे."

- हनुमंत परब, समाजकार्यकर्ते

"म्हादई बचावसाठी पदयात्रा काढलेल्या लोकांना अडविणे ही शरमेची गोष्ट आहे. त्यात एका सत्तेतील भाजप आमदाराचा मोठा हात होता. पंचायतींनी म्हादईसाठी ठरावही घेतलेले आहेत. परंतु तेच सरपंच पदयात्रेला मात्र हरकत घेतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथे १४४ सारखे कलम लादले जाते. तशी परिस्थिती आहे का? हे व्यक्ती स्वतंत्र दडपले जाते आहे. हे पडद्या मागे घाणेरडे राजकारण सुरू आहे."

- रणजीत राणे, समाजकार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com