Bhoma Elevated Road: मंदिर, तलावाला धक्का लागणार नाही! भोम उन्नत मार्गाबाबत सरकारचा उच्च न्यायालयात दावा

Goa Infrastructure Project: मंदिराच्या संरचनेला अजिबात स्पर्श केला जाणार नाही आणि तलावाचे अस्तित्व जपत त्यावर सुरक्षितरित्या पूल उभारला जाईल, असे राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
Goa Infrastructure Project
Bhoma Elevated RoadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भोम (फोंडा) येथील प्रस्तावित उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने स्पष्ट केले, की या प्रकल्पामुळे येथील मंदिर आणि तलावाला किंचितही धक्का लागणार नाही. मंदिराच्या संरचनेला अजिबात स्पर्श केला जाणार नाही आणि तलावाचे अस्तित्व जपत त्यावर सुरक्षितरित्या पूल उभारला जाईल, असे राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

यावेळी पांगम म्हणाले, की या प्रकल्पाशी संबंधित याचिका कालमर्यादेच्या तत्त्वावर टिकण्याजोगी नाही. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन सरकारने २०२३ मध्येच संपादित केली आहे. तसेच स्थानिकांच्या मनात असलेल्या शंका निरर्थक आहेत. याचिकाकर्त्यांची मुख्य भीती मंदिराला हानी पोहोचेल, अशी होती. सरकारने स्पष्ट केले, की मंदिराच्या संरचनेला अजिबात स्पर्श केला जाणार नाही.

Goa Infrastructure Project
Goa Politics: भाजपला रोखू! गोवा विकू देणार नाही! मल्लिकार्जुन खर्गेंची गर्जना, एकीचे आवाहन; काँग्रेसमध्‍ये नवचैतन्‍य

स्थानिक तलावावर पुलाचे बांधकाम केले जाणार असून, तलावाचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम ठेवले जाईल. राज्य सरकारने प्रकल्पाचे सुधारित आणि मूळ आराखडे उच्च न्यायालयासमोर सादर केले आहेत. उच्च न्यायालयाने हे नकाशे याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सोपविण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून ते अशिलांना प्रत्यक्ष पाहणी करून दाखवू शकतील.

Goa Infrastructure Project
Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

वकिलांनी नकाशे अशिलांना दाखवावेत

जमीनमालकांनी यापूर्वी दाखल केलेली अशीच एक याचिका उच्च न्यायालयाने आधीच फेटाळली आहे, याकडेही पांगम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनही अशा प्रकारच्या याचिका दाखल केल्या जात असल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले. वकिलांनी हे नकाशे याचिकाकर्त्यांना दाखविल्यानंतर न्यायालयाच्या पुढील निर्देशांनुसार पुढील सुनावणी पार पडेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com