Bramhakarmali Temple Theft
Bramhakarmali Temple TheftDainik Gomantak

Bramhakarmali Temple Theft: ब्रह्मदेव मंदिरातील फंडपेटी फोडली, ब्रह्मकरमळी परिसरात खळबळ; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

Valpoi Police Register Temple Theft Case: सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथील प्रसिद्ध श्री ब्रह्मदेव देवस्थानातील फंडपेटी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. चोरी ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याविरोधात वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published on

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथील प्रसिद्ध श्री ब्रह्मदेव देवस्थानातील फंडपेटी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. चोरी ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याविरोधात वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल उर्फ विश्वास गोविंद झर्मेकर (३८, नानोडा-सत्तरी) असे चोरट्याचे नाव आहे.

बुधवारी (28 मे) सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. सकाळी मंदिर स्वच्छतेसाठी आलेल्या कामगाराला फंडपेटी फोडलेली दिसली. याबाबत त्याने लगेच देवस्थान सेवा समितीचे उपाध्यक्ष वामनराव देसाई यांना कळवले. त्यानंतर देवस्थानचे पदाधिकारी मंदिरात दाखल झाले व त्यांनी वाळपई (Valpoi) पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. फॉरेन्सिक लॅब व डॉग स्क्वॉडच्या पथकाने सुद्धा स्थळी तपास करत विविध ठसे आणि नमुने गोळा केले.

Bramhakarmali Temple Theft
Basaveshwar Temple Theft: सत्तरीतील बसवेश्वर मंदिरात पुन्हा चोरी! फंडपेटी लंपास, CCTVसह साहित्याची तोडफोड

पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा, पोलिस निरीक्षक विजय राणे तसेच हवालदार नीलेश फोगेली, शिपाई दक्ष खांडेपारकर, विशाल परब, जानू धावणे हे तपासासाठी घटनास्थळी उपस्थित होते.

Bramhakarmali Temple Theft
Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना टिपली आहे. चोरटा मंगळवारी रात्री ९.१५ वा. मंदिराच्या मागील बाजूने आत शिरल्याचे दिसते. आत शिरल्यावर सोबत आणलेली चार गर्भकुडी समोर पसरवून त्यावर झोपतो. नंतर काही वेळाने उठून कटरने फंडपेटी अगदी आरामात तोडताना दिसतो. फंड पेटीतून रक्कम काढल्यावर गर्भकुडीचाही दरवाजा फोडून आत प्रवेश करतो. हा चोरटा तब्बल अडीच तास मंदिरात (Temple) होता. सीसीटीव्हीत चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. पोलिस सध्या या चोरट्याच्या मागावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com