Bhandari Community In Goa: तातडीने 'अध्यक्ष'पदावरून पाय उतार व्हा! भंडारी वॉरियर्सचे 'भाजप कनेक्शन'वरुन आरोप

Gomantak Bhandari Samaj: गोव्यात भाजप सरकार हे भंडारी समाज बांधवांना हीन दर्जाची वागणूक वेळोवेळी देत असून सर्वात मोठ्या समाजाला निवडणुकीसाठी वारंवार वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप भंडारी वॉरियर्सचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी पत्रकार परिषदेत पेडणे येथे केला.

Bhandari CommunityDainik Gomantak
Published on
Updated on

Bhandari Warriors Allegation On Gomantak Bhandari Samaj

पेडणे: ‘गोव्यात सर्वाधिक संख्येने असलेला भंडारी समाज हा भाजप सरकारच्या दावणीला अवैध रित्या अध्यक्षपद सांभाळणाऱ्या अशोक नाईक यांनी बांधला आहे. त्यामुळे गोव्यात भाजप सरकार हे भंडारी समाज बांधवांना हीन दर्जाची वागणूक वेळोवेळी देत असून सर्वात मोठ्या समाजाला निवडणुकीसाठी वारंवार वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप भंडारी वॉरियर्सचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी पत्रकार परिषदेत पेडणे येथे केला.

भाजपच्या दत्ता खोलकर यांनी भंडारी समाजावर प्रतिक्रिया देताना मर्यादा ओळखून बोलावे, अन्यथा परिणामास सज्ज रहावे इशाराही सर्वांनी यावेळी दिला.

बर्डे म्हणाले भंडारी की ,समाज बांधवांवर आणि या समाजावर वारंवार होणारा अन्याय याला वाचा फोडण्याचे सोडून अशोक नाईक हे भाजप सरकारचं ताटाखालचे मांजर होऊन त्यांच्या इशाऱ्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचत असून, घटना दुरुस्ती करताना नको ती कलम या घटनेत समाविष्ट करून अशोक नाईक यांनी ते दाखवून दिलेले आहे.

Gomantak Bhandari Samaj: गोव्यात भाजप सरकार हे भंडारी समाज बांधवांना हीन दर्जाची वागणूक वेळोवेळी देत असून सर्वात मोठ्या समाजाला निवडणुकीसाठी वारंवार  वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप  भंडारी वॉरियर्सचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी पत्रकार परिषदेत पेडणे येथे केला.
Bhandari Community In Goa: धक्कादायक बाब! गोमंतक भंडारी संघटनेतील नियम बदल अन्यायकारक; समाज माध्यमांवर तीव्र पडसाद

अशी व्यक्ती आमच्या समाजाचं हित कुठल्याही प्रकारे जोपासू शकत नाही त्यांनी तातडीने अध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावे असे आवाहन करत अशोक नाईक या निष्क्रिय अध्यक्षाचा भंडारी वॉरियस तीव्र शब्दात निषेध केला.

पेडणे येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संजय बर्डे बोलत होते. यावेळी दीपेश नाईक, जनार्दन ताम्हणकर, अमृत आगरवडेकर, अनिल केरकर, गुरु वेर्णेकर आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com