Arvalem Rudreshwar Temple: रुद्रेश्वर देवस्थान भंडारी समाजाचेच! महाशिवरात्रीच्या वादामागे राजकीय हस्तक्षेप

Arvalem Rudreshwar Temple: राजकीय हस्तक्षेपामुळेच हरवळेतील वाद नियंत्रणात आणण्यास सरकारी यंत्रणा कमी पडली, असा आरोपही देवस्थान समितीने केला आहे.
Arvalem Rudreshwar Temple
Arvalem Rudreshwar TempleDainik Gomantak

Arvalem Rudreshwar Temple

हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान हे भंडारी समाजाचेच असून, घटनेनुसार या देवस्थानात केवळ भंडारी समाजालाच अधिकार आहेत, असा दावा देवस्थान समितीने केला आहे. गेल्या महाशिवरात्री उत्सवावेळी हरवळेत जो वाद निर्माण झाला. पालखी आणि रथोत्सवात खंड पडला, त्यामागे राजकीय शक्तीचा हात आह, असा आरोप श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीने केला आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळेच हरवळेतील वाद नियंत्रणात आणण्यास सरकारी यंत्रणा कमी पडली. सरकारी यंत्रणेची त्यावेळची भूमिका पाहता. या वादामागे राजकीय शक्ती असल्याचे स्पष्ट होत आहे. असा आरोपही देवस्थान समितीने केला आहे.

डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेस रुद्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर, सचिव सुभाष किनळकर, उपाध्यक्ष दीपक नाईक, मुखत्यार संगेश कुंडईकर आणि उपमुखत्यार वासुदेव गावकर उपस्थित होते.

महाशिवरात्री उत्सवावेळी हरवळेत जो वाद झाला. श्री केळबाय सायबीण आणि रुद्रेश्वर देवाच्या भेटीच्या परंपरेत खंड पडला, असे किनळकर यांनी सांगितले. हा वाद पेरण्यास जे कोणी कारणीभूत आहेत. त्यांना श्री देव रुद्रेश्वर काय तो धडा शिकवेल. तसे देव रुद्रेश्वराला गाऱ्हाणेही घातले आहे,असे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

Arvalem Rudreshwar Temple
Goa ST Reservation: आधी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा, आता तटस्‍थ राहण्‍याची आदिवासी मंचची भूमिका

निवडणुकीनंतर रुद्रेश्वर ज्योत !

भंडारी समाजामध्ये फूट घालण्याचे कोणीही कितीही प्रयत्न केले, तरी देव रुद्रेश्वर हे प्रयत्न सफल होऊ देणार नाही. भंडारी समाज एकसंघ असून, यापुढे एकसंघच राहणार.

असा ठाम विश्वास देवस्थानचे सचिव सुभाष किनळकर यांनी व्यक्त करुन लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक.तालुक्यात ''रुद्रेश्वर ज्योत'' नेवून भंडारी समाज शक्तीप्रदर्शन करणार आहे. असे किनळकर यांनी स्पष्ट केले.

रविवारी पालखी उत्सव

येत्या रविवारी (ता.७) रात्री ८वा. रुद्रेश्वर देवस्थानचा पालखी उत्सव होणार आहे. हा उत्सव सुरळीतपणे होण्यासाठी देवस्थान समिती तयार आहे,असे सुभाष किनळकर यांनी सांगितले. समस्त भंडारी ज्ञातीबांधव आणि भक्तगणांनी या पालखी सोहळ्यास उपस्थित राहावे,असे आवाहनही किनळकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com