Bhandari Samaj: ‘ओबीसीं’ची जनगणना करा! 'भंडारी' नेत्यांचा आग्रह, मगो पक्षाध्यक्ष ढवळीकर यांना निवेदन सादर

Census for OBC community: मगो पक्ष सरकारमध्ये सामील असल्याने पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन यांनी सरकारला जनगणना करण्यासाठी आग्रह करावा, असे या भंडारी समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
Deepak Dhavalikar, Bhandari Samaj Leaders
Deepak Dhavalikar, Bhandari Samaj LeadersDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ओबीसींना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आधी जनगणना करा, अशी मागणी करीत भंडारी समाजाच्या नेत्यांनी आज (सोमवारी) मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांना निवेदन सादर केले. मगो पक्ष सरकारमध्ये सामील असल्याने पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सरकारला जनगणना करण्यासाठी आग्रह करावा, असे या भंडारी समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

फोंड्यात हे निवेदन दीपक ढवळीकर यांना देण्यात आले, त्यावेळेला माजी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर, माजी उद्योगमंत्री महादेव नाईक तसेच कुडचडेचे माजी आमदार शाम सातार्डेकर, थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर व भंडारी समाजाचे पदाधिकारी मशाल आडपईकर आणि दीक्षक नाईक आदी उपस्थित होते.

दयानंद मांद्रेकर म्हणाले, राज्यात भंडारी समाज संख्येने फार मोठा आहे, त्यामुळे ओबीसींना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी जनगणना महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे, त्यामुळे आता मगो पक्षाला हे निवेदन सादर करून भंडारी अर्थातच ओबीसी समाजाला मगो पक्षाने सहकार्य करावे, अशी मागणी दयानंद मांद्रेकर यांनी केली.

महादेव नाईक म्हणाले, ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी ही जनगणना महत्त्वाची असून त्यानुसार आरक्षण आवश्‍यक आहे. भंडारी समाजाने आतापर्यंत अनेक उपक्रम आखून ते यशस्वी केले आहेत, त्यात रूद्रेश्‍वर रथयात्रा व इतर उपक्रमांचा समावेश आहे. भंडारी अर्थातच ओबीसी समाजाला राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधींकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मगो पक्षाने सहकार्य करावे.

Deepak Dhavalikar, Bhandari Samaj Leaders
Caste Based Census: जनगणनेच्या रेट्यासाठी पक्ष, मतभेद विसरून एकत्र या! गिरीश चोडणकरांचे आवाहन

मशाल आडपईकर म्हणाले, ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी सर्व समाज संघटीत झाले आहेत. त्यात भंडारी समाजाने मुख्यमंत्री तसेच इतर राजकीय पक्षांना जनगणना करण्यासाठी निवेदन सादर केले आहे. यापुढे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण खासदार विरियातोन फर्नांडिस, सदानंद शेट तानावडे यांचीही भेट घेऊन त्यांना हे स्मरणपत्र दिले जाईल, असे मशाल आडपईकर म्हणाले. भंडारी समाजाच्या नेत्यांनी त्यानंतर कृषीमंत्री रवी नाईक यांची सदिच्छा भेट घेतली.

Deepak Dhavalikar, Bhandari Samaj Leaders
Caste Based Census: ...तर जातनिहाय जनगणनेचा विषय विधानसभेत पुन्हा मांडू! सरदेसाईंचे आश्वासन; कांदोळकरांनी केले अभिनंदन

‘मगो पक्षाचा पाठिंबा!

ओबीसी समाजाला मगो पक्षाचा कायम पाठिंबा आहे. ओबीसींना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मगो पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दीपक ढवळीकर यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com