पणजी: मोटार वाहन कायदा 1988 अधिनियम 2021 ची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. आता वाहतूक नियम उल्लंघनासंदर्भात करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम ही दहा पटीने वाढणार आहे. याशिवाय काही गंभीर गुन्ह्यांमध्ये चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित करण्याची तरतूदही केल्याची माहिती वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
देशभर वाढणारे वाहन अपघातांचे प्रमाण आणि त्यातील मृत्यू लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायदा 1988 च्या अधिनियमात बदल करत नवे अधिनियम केले आहेत. या नव्या कायद्यानुसार मोटार वाहनाच्या संदर्भातील दंडात्मक रकमेमध्ये मोठी वाढ केली असून वाहनचालक परवाने रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. हा कायदा 1 एप्रिलपासून लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले असून याबाबत नागरिकांनी दक्षता पाळणे गरजेचे आहे.
अशी होईल दंडाची आकारणी
विनाहेल्मेट तसेच ट्रिपल सीट वाहन चालवण्यासाठी पूर्वीच्या 100 रुपये दंड होता. आता 1 हजार रुपये दंड भरावा लागेल.
विनासीटबेल्ट वाहन चालविल्यास 100 रुपयांवरून 1 हजार रुपये भरावे लागतील.
विमा नसणाऱ्या वाहनांना आता 2 हजार रुपयांचा दंड.
अतिवेगाने गाडी चालवल्यास 100 रुपयांवरून 1 हजार रुपये दंड. हा गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास 2 हजार रुपये दंड.
यातील काही गुन्ह्यांसाठी चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काही दिवसांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.