Betim Gurdwara Langar : भुकेल्यांसाठी बेतीतील आधार गुरुद्वाराचा ‘लंगर’

वर्षाचे 365 दिवस गुरुद्वारांमध्ये लंगर चालवला जातो
Betim Gurdwara
Betim GurdwaraDainik Gomantak
Published on
Updated on

बेतीतील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा हे अनेक सरदार (शीख) समुदायाचे प्रार्थनास्थळ आहे. तसेच या भागातील अनंत भुकेल्या लोकांसाठी निःशुल्क पोटभर अन्न मिळण्याचे स्थळ आहे. वर्षाचे 365 दिवस या गुरुद्वारांमध्ये भुकेल्या भक्तजनांसाठी लंगर चालवला जातो. रविवारी तर जवळपास 500 भक्तगण या ‘लंगर’चा लाभ घेतात.

दररोज सकाळी साडेपाच वाजता नित् नाम (देवाची पूजा व नामस्मरणा)ने या प्रार्थनाघराची सुरुवात होत असून सकाळी 8 वा. किर्तन, तदनंतर सकाळी न्याहारीसाठी व दुपारी आणि रात्री जेवणासाठी लंगर चालते. या प्रार्थना किंवा लंगर हे फक्त शीख समुदायासाठी नसून कोणीही भाविक व भुकेली व्यक्ती प्रार्थनेचा व लंगरचा लाभ घेऊ शकते.

Betim Gurdwara
Goa Fish Market : मासे विक्रेत्यांनी जपला स्वच्छतेचा मंत्र!

15 सप्टेंबर 1985 दिवशी लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. गोपाल सिंग यांच्या हस्ते सुरू झालेले हे गुरुद्वारा दिवसागणित विकसित होत आहे. अनेक मान्यवरांनी या गुरुद्वाराला भेटी दिल्या परंतु श्रीमंत आणि गरिब हे सर्व एकाच पंक्तीत बसतात.

या प्रार्थना स्थळाच्या कमिटीचे अध्यक्ष हरविंदर सिंग धाम हे प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालून काम करून घेतात. त्यामुळे प्रत्येक काम उत्तम होत असल्याचे भाविकांनी सांगितले.

गोवा मुक्ती लढ्यात शीख समुदायाचे लोकही होते.

Betim Gurdwara
Air India Delhi-London Flight Returns: लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा गोंधळ, दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

कोरोना काळात हजारोंना आधार !

कोरोना काळात तर या लंगर कडून जवळपास तीन हजार लोकांना दररोज लंगर व रेशन दिले जात होते. दिल्लीतून गुरूद्वाराकडून कोरोना काळात ऑक्सीजन, औषध व अन् पुरवठाही केला गेला, लंगरची मदत तर उत्तर गोव्यात सगळीकडे पोहोचली.

कमिटीचे अध्यक्ष हरविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात कुठेही गेल्यास गुरुद्वारा असतो. एक-दोन शिख समुदायाचे व्यक्ती कुठेही राहण्यास गेल्या तर त्या जवळपास गुरुद्वारा तयार करतात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांना अन्नपुरवठा करणे ही गुरुनानकांची शिकवण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com