Benaulim ZP By-Election: बाणावलीत प्रचार थांबला, छुपी राजकीय खेळी सुरूच; ‘इंडिया’तच लढा

Benaulim ZP By-Election: आप’-कॉंग्रेसच्या बंडखोरांमध्ये चुरस
Benaulim ZP By-Election
Benaulim ZP By-Election Dainik Gomantak
Published on
Updated on

Benaulim ZP By-Election:

मडगाव, बाणावली जिल्‍हा पंचायत पोट निवडणुकीचा जाहीर प्रचार आज शुक्रवारी सायंकाळी ५ वा. थांबला असला तरी या मतदारसंघातील राजकीय छुपी खेळी सुरूच असून एकमेकांवर कुरघाेडी कशी करता येईल, याचेच आराखडे सध्‍या आखले जात आहेत.

सुमारे २२ हजार मतदारांचा समावेश असलेल्‍या या जिल्‍हा पंचायत मतदारसंघात ‘इंडिया’ चा उमेदवार असलेले ‘आप’चा उमेदवार जोसेफ पिमेंता हे निवडून येणार की, काँग्रेसचे बंडखोर म्‍हणवून घेणारे ग्रेफन्‍स फर्नांडिस आणि रॉयला फर्नांडिस हे बाजी मारणार याचीच सध्‍या बाणावलीत चर्चा चालू आहे.

निवडणुकीच्‍या मतदानाला केवळ एक दिवस बाकी असताना ‘आप’ने आपला उमेदवार निवडून आणण्‍यासाठी गोव्‍यातील सर्व ‘आप’ नेत्‍यांची फौज बाणावलीत आणून ठेवली असून दोन दिवसांपूर्वी ‘आप’चे केंद्रीय आयाेजन सचिव पंकज गुप्‍ता यांनीही बाणावलीत येऊन प्रचाराचा आणि एकूणच स्‍थितीचा आढावा घेतला.

बाणावलीत ‘आप’चा उमेदवार जिंकणार हे कधीचेच निश्‍चित झाले आहे. ‘आप’चे कार्यकारी अध्‍यक्ष जर्सन गोम्‍स म्‍हणाले, आम्‍ही फक्‍त रस्‍त्‍यावर येऊनच प्रचार केलेला नाही तर आमचे राज्‍यभरातील नेते बाणावलीत आलेले असून ते पडद्यामागे राहून सर्व आखणी करत आहेत. काँग्रेसने आपला पूर्ण पाठिंबा पिमेंता यांना दिला असून विराेधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनीही आपले बळ पिमेंताच्‍या बाजूने लावले आहे.

अन्‍य एक उमेदवार ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना चर्चिल आलेमाव आणि त्‍यांचे सुपुत्र सावियो आलेमाव यांनी पाठिंबा दिला असून आपण अपक्ष म्‍हणून रिंगणात उभा असलो, तरी प्रत्‍यक्षात काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसने बाणावलीची जागा ‘आप’ला सोडून काँग्रेस कार्यकर्त्‍यांवर अन्‍याय केला. या कार्यकर्त्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी आपण रिंगणात उभे असल्‍याचे फर्नांडिस यांनी सांगितले. बाणावलीच्‍या माजी जिल्‍हा पंचायत सदस्‍य मारिया रिबेलो यांनीही ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना पाठिंबा जाहीर केला.

Benaulim ZP By-Election
Goa Police: गोवा पोलिसांना चकवा, उत्तर प्रदेशातून अटक केलेला आरोपी मुंबई विमानतळावरुन फरार

मागच्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्‍या उमेदवार असलेल्‍या रॉयला फर्नांडिस यावेळी अपक्ष उमेदवार म्‍हणून रिंगणात आहेत. त्‍यांनीही काँग्रेस कार्यकर्त्‍यांवर झालेल्‍या अन्‍यायाला वाचा फाेडण्‍यासाठी आपण रिंगणात असल्‍याचे सांगितले. ‘आप’चे जिल्‍हा पंचायत सदस्‍य हेंझल फर्नांडिस यांनी बनावट जात दाखला लावून निवडणूक लढविल्‍याने ते अपात्र ठरले. आणि त्‍यामुळे बाणावलीच्‍या मतदारांना दुसऱ्यांदा मतदान करावे लागत आहे. बाणावलीच्‍या लोकांवर ‘आप’ने ही निवडणूक लादली. अशा धोकेबाजांना काँग्रेस पाठिंबा देते, ही गोष्‍ट जास्‍त खेदाची असल्‍याचे

त्‍या म्‍हणाल्‍या.

चर्चिलचे पुतणे वॉरन आलेमाव यांनी रॉयला फर्नांडिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ग्रेफन्‍स फर्नांडिस हे जरी आपण काँग्रेसचे कार्यकर्ते म्‍हणवत असले तरी प्रत्‍यक्षात त्‍यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्‍यामुळे आपण रॉयला फर्नांडिस यांना पाठिंबा दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

मतदानासाठी भरपगारी सुटी

बाणावली जिल्‍हा पंचायतीच्‍या पोट निवडणुकीसाठी रविवार २३ जून रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी जाहीर करण्‍याचा आदेश कामगार आयुक्‍त डाॅ. लेविन्‍सन मार्टिन्‍स यांनी जारी केला आहे.

फाेंडा तालुक्‍यातील कुंडई, वळवई, बाेरी व केरी, सासष्‍टी तालुक्‍यातील राशोल, सुरावली आणि असोळणा, केपे तालुक्‍यातील शेल्‍डे, डिचोली तालुक्‍यातील कुडणे आणि बार्देेेश तालुक्‍यातील या पंचायतीतील प्रत्‍येकी एका प्रभागात पोट निवडणूक होत असून त्‍यांचेही मतदान २३ जून रोजी असल्‍याने या प्रभागातील कामगारांनाही भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com