Panaji News : पोटनिवडणूक मतपत्रिकेद्वारे होणार; ३९ उमेदवारी अर्ज दाखल

Panaji News : त्यामध्ये ३५ उमेदवारी अर्ज पंचायतीसाठी तर ४ अर्ज जिल्हा पंचायतीसाठी आहेत. चार पंचायतीमध्ये चौरंगी, प्रत्येकी दोन पंचायतीमध्ये तिहेरी लढत होणार आहे. पोटनिवडणूक २३ जूनला होणार असून मतमोजणी २४ जूनला होणार आहे.
Voting
VotingDainiK Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, बाणावली जिल्हा पंचायत व १० पंचायतीच्या पोटनिवडणूक प्रभागांसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ अर्ज दाखल करण्यात आल्याने एकूण संख्या ३९ झाली आहे.

त्यामध्ये ३५ उमेदवारी अर्ज पंचायतीसाठी तर ४ अर्ज जिल्हा पंचायतीसाठी आहेत. चार पंचायतीमध्ये चौरंगी, प्रत्येकी दोन पंचायतीमध्ये तिहेरी लढत होणार आहे. पोटनिवडणूक २३ जूनला होणार असून मतमोजणी २४ जूनला होणार आहे. पंचायत व जिल्हा पंचायत निवडणूक मतपत्रिकेद्वारे होणार आहे.

गेल्या ५ जूनपासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली होती. काल सहाव्या दिवशीपर्यंत पंचायतीसाठी २१ तर जिल्हा पंचायतीसाठी एकमेव अर्ज सादर झाला होता. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा पंचायतीसाठी तिघांनी अर्ज सादर केल्याने बाणावली मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

सुकूर पंचायत प्रभाग १० मधून ७, कुडणे पंचायत प्रभाग २ मधून २, शेल्डे पंचायत प्रभाग २ मधून ४, कुंडई पंचायत प्रभाह ७ मधून ४, केरी पंचायत प्रभाग ३ मधून ४, वळवई पंचायत प्रभाग २ मधून ४, बोरी पंचायत प्रभाग ९ मधून ३, असोल्णा पंचायत प्रभाग १ मधून ३, राशोल पंचायत प्रभाग ५ मधून २, सेरावली पंचायत प्रभाग २ मधून २ उमेदवाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असूनही ४ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात आम आदमी पक्ष वगळता इतर ३ उमेदवार अपक्ष आहेत.

बाणावली मतदारसंघात २०,१२९ मतदार असून त्यामध्ये ९४५५ पुरुष तर १०,७४ महिला असून एकूण मतदान केंद्रे २७ आहेत.

दहा पंचायतींच्या दहा प्रभागासाठी एकूण ४७११ मतदार आहेत त्यापैकी २२६५ पुरुष तर २४४६ महिला आहेत. सर्वाधिक कमी मतदार (२२७) व उमेदवार (२) राशोल पंचायतीच्या प्रभाग ५ मध्ये तर सर्वाधिक मतदार (९३०) व उमेदवार (७) सुकूर पंचायतीच्या प्रभाग १० मध्ये आहेत.

Voting
Ponda Goa News: बकरी ईदच्या काळात उसगाव मांस मार्केट परिसरात जमावबंदी का लागू केलीय?

भाजपचा पाठिंबा?

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक भाजपने ती पक्षावर न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत योग्य उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com