Beyond the Blue: अथांग निळाईच्या आड लपलेला 'बियॉंड द ब्लू'; एका अद्भुत विश्वाची ओळख

Benaulim Beach Beyond the Blue walk: श्वर्या रिवणकर आणि तिच्या टीमने 30 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या 'बियॉंड द ब्लू' पदभ्रमणातून बाणावली समुद्रकिनाऱ्यावरील उबदार वाळू आणि पाण्यामधील परिसंस्थेला अनेकांनी जाणून घेतले.
Benaulim Beach Beyond the Blue walk
Beyond the BlueDainik Gomantak
Published on
Updated on

Benaulim Beach Beyond The Blue walk

समुद्रकिनाऱ्यावरील ओल्या वाळूत चालणे हा मनाला उत्साहीत करणारा उपचार असू शकतो त्याच बरोबर त्या वाळू-विश्वातील जीवचरांना‌ जाणून घेण्याचा तो एक मनोरम मार्गही असू शकतो.‌ ऐश्वर्या रिवणकर आणि तिच्या टीमने 30 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या  'बियॉंड द ब्लू' पदभ्रमणातून  बाणावली समुद्रकिनाऱ्यावरील उबदार वाळू आणि पाण्यामधील परिसंस्थेला अनेकांनी जाणून घेतले.

'बियॉंड द ब्लू' हे नाव सार्थ अशासाठी होते की समुद्राच्या अथांग निळाईला भुलून जाऊन किनाऱ्यावर अस्तित्वात असलेल्या इवल्या जीवसृष्टीकडे मात्र आपण सहज दुर्लक्ष करत असतो. नजरेआड झालेल्या अशा सृष्टीकडे जेव्हा आपण जागरूक होऊन पाहतो तेव्हा त्या सृष्टीच्या संवर्धनासाठी आपोआपच प्रयत्नरतही होत असतो. 

आयटीयु (इन्टू द अननोन) या संस्थेच्या संस्थापिका ऐश्वर्या एक छायाचित्रकार आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. पर्यावरणाबद्दल संशोधन करणारे तज्ज्ञ तसेच विशेष कौशल्ये असलेल्या लोकांना एकत्र आणून त्यांचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या त्या प्रयत्न करत आहेत. 'आयटीयू'ने आयोजित केलेल्या या किनारी पदभ्रमणासाठी प्रतिभा त्रिपाठी या तज्ज्ञ मार्गदर्शिका लाभल्या होत्या.

‘लाइफ सायन्स’च्या शिक्षिका असलेल्या प्रतिभा त्रिपाठी वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्यात योगदान देणाऱ्या इवल्या जीवांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात गेल्या काही काळापासून सक्रिय आहेत. त्याशिवाय कासवांच्या संवर्धनासाठी प्रयत्नरत असलेल्या आणि समुद्र तसेच जमिनीवरील वाया गेलेल्या जाळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम लोकांना पटवून देणाऱ्या 'ट्री फाउंडेशन'च्या सदस्यांचाही या पदभ्रमणात सहभाग होता.

‘आयटीयु’चे पुढील सत्र हे खगोलशास्त्र आणि निसर्ग या संबंधात आहे. पृथ्वी आणि ब्रम्हांड या दोन चमत्कारांशी जोडणारा हा जादुई अनुभव‌ असेल.  'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ ऍस्ट्रॉनॉमी' या संस्थेच्या सहकार्याने आयोजित होणारे हे सत्र 21 डिसेंबर रोजी दक्षिण गोव्यात होणार आहे. आयटीयु आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती करून घेण्यासाठी त्यांच्या itu.experience या फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य भेट द्या.

किनारी पदभ्रमणात खालील महत्त्वाच्या विषयांवर माहिती करून देण्यात आली: 

समुद्र किनाऱ्यावरील परिसंस्थेमध्ये संतुलन राखण्यासाठी वाळूच्या टेकड्या कशा प्रकारे योगदान देतात, समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ऑलिव्ह गोगलगायी, मृदुकाया जिवचर आणि इतर जीवांची माहिती, किनाऱ्यावर आढळणाऱ्या बीच मॉर्निंग ग्लोरी,  खारफुटी, कॅज्युआरीना (खड शेरणी) आणि इतर वनस्पतींची ओळख. 

Benaulim Beach Beyond the Blue walk
Divjotsav: दिवजांच्या प्रकाशाने उजळली मंदिरे! भजन, पालखी, गाऱ्हाणी सादर; पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा

या पदभ्रमण सत्रात शेफ, अभियंते, ॲनिमेटर असे विविध पार्श्वभूमीतील तसेच सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते. सायंकाळी 4.30 वाजता या पदभ्रमणाला सुरुवात झाली. सूर्यास्ताच्या वेळी सर्वांनी मिळून चहा आणि नाश्त्याचा आनंदही अनुभवला. या कार्यक्रमाचा समारोप 'ध्यान' सत्राने झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com