गोवा भाजप सरकारकडून रोजगाराच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल

भाजप सरकारचा दहा हजार नोकऱ्यांचा दावा म्हणजे जुमला आहे.
Before Goa elections BJP government mislead youth
Before Goa elections BJP government mislead youth Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप सरकारचा दहा हजार नोकऱ्यांचा दावा म्हणजे जुमला आहे. शंभर नोकऱ्या सुद्धा देण्यात अपयशी ठरलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देणाऱ्या ‘जीएचआरडीसी’कडून कर्मचारी घेण्यास आपल्या विभागांना सांगत आहेत. निवडणुकीपूर्वी राज्य सरकार पुन्हा एकदा रोजगाराच्या नावाखाली गोव्यातील तरुणांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

Before Goa elections BJP government mislead youth
‘IITF’ दिल्ली येथे गोवा पॅव्हेलियनचे उद्‍घाटन

अलीकडेच, राज्य सरकारने त्यांच्या सर्व विभाग, स्वायत्त संस्था, महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या गरजेनुसार गोवा मानव संसाधन विकास महामंडळातील कर्मचारी, कनिष्ठ कार्यालय साहाय्यक आणि वैयक्तिक साहाय्यक यांच्या सेवा घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली. राज्यात बेरोजगारी हा कळीचा मुद्दा बनला आहे. विविध क्षेत्रांत नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी मुख्यमंत्री सावंत यांनी निवडणुकीपूर्वी खोटे आश्वासन दिले. यापूर्वी त्यांनी दहा हजार सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. आपले वचन पाळता येत नाही हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी आता आपल्या विभागांना ‘जीएचआरडीसी’मधून कर्मचारी नियुक्त करण्यास सांगितले, असे म्हांबरे म्हणाले.

Before Goa elections BJP government mislead youth
गोव्यातील मटका जुगारावर कारवाई करा!

‘जीएचआरडीसी’ ही कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी घेण्यासाठी ओळखली जाते, तेही कोणत्याही भत्त्याशिवाय. आमचे तरुण बीएसस्‍सी, एमएस्‍सी, बी.कॉम आणि एम.कॉम आहेत. परंतु, त्यांचे कौशल्य आणि गरजेनुसार नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका म्‍हांबरे यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Tourist Arrested Goa
Goa Chief Minister’s t Scheme
 Fuel Shortage Rumors Goa
 Jit Arolkar kind Gesture Towards Child
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com