online admission
online admission

बीएड ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया; अर्जांचे आवाहन

शैक्षणिक वर्ष 2023-2025साठी 3 काॕलेजीस उपलब्ध
Published on

2023-2025 या शैक्षणिक वर्षांसाठी बीएड आॕनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे उच्च शिक्षण संचालनालय पर्वरी, गोवा सरकार यांनी कळविले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2025साठी निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पणजी, जीव्हीएम कॉलेज ऑफ एज्युकेशन-फोंडा आणि पीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन फोंडा गोवा ही काॕलेजीस उपलब्ध आहेत.

online admission
Goa Congress : बागामधील मलनिस्सारण प्रकल्प बंद करा; काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

काॕमन बीएडची सॉफ्ट कॉपी आणि विशेष बीएड प्रॉस्पेक्टस https://www.dhe.goa.gov.in/ या वेबसाईटवर विनामूल्य उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२३ आहे.

अर्जदारांनी गुणवत्ता यादी आणि समुपदेशन तारखांच्या घोषणेसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटला भेट द्यावी. बीएड प्रवेश समुपदेशन आणि सीट निश्चितीसाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे, असे उच्च शिक्षण संचालनालयाचे डाॕ. महादेव गावस यांनी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com