National Service Scheme : ‘एनएसएस’मध्‍ये सहभागी होऊन जीवनात यशस्‍वी व्‍हा : जॉर्ज

National Service Scheme : दीपविहार विद्यालयाचे विद्यार्थी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्‌घाटन
National Service Scheme
National Service SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी, सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाशिवाय सुखसोयींचे साधन अन्य कुठेच दिसणार नाही. कारण वर्गाबाहेर गेल्यानंतर जिथे तिथे केवळ स्पर्धाच लागलेल्या असतात.

या युगात यशस्‍वी होण्‍यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करावे, असे आवाहन भारतीय पोलिस सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी केले.

दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शपथग्रहण व उद्‌घाटन सोहळ्‍यात प्रमुख पाहुणे म्‍हणून जॉर्ज बोलत होते. बायणा येथील रवींद्र भावनात झालेल्‍या या कार्यक्रमाला प्राचार्य मारिया डायस, विद्यालयाचे व्यवस्थापक संजय बाणावलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. सुनील शेट, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. श्रीकांत पालसरकर, मनीषा नाईक, किरण सैल, विद्यार्थी मंडळाच्या प्रा. कृपस्काया फिगेरेदो उपस्थित होत्या.

National Service Scheme
PM Narendra Modi B'Day: अक्षय कुमार-कंगना रणौतसह बॉलिवूड स्टार्सनी दिल्या PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रा. सुनील शेट यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्‍पषष्‍ट केला. प्रा. मनीषा नाईक व कृपस्काया फिगरेदो यांनी अहवाल सादर केला.

यावेळी घेण्यात आलेल्या देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धेतील तसेच अमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त आयोजित स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण नंदा होन्नावरकर, मिलिंद काकोडकर, रुपलता डिचोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ब्लांच फर्नांडिस यांनी केले तर शेवटी प्रा. शुभला नाईक बर्डे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com