Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Bear Attack Goa: काजूर-केपे परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. आपल्या बागायतीत काम करीत असताना अस्वलाने अचानक हल्ला केल्याने रामदास वेळीप (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
Bear Attacks
Bear AttacksDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: काजूर-केपे परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. आपल्या बागायतीत काम करीत असताना अस्वलाने अचानक हल्ला केल्याने रामदास लक्ष्मण वेळीप (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साधारणपणे एकच्या सुमारास रामदास वेळीप हे घरापासून काही अंतरावर असलेल्या बागेत काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी झाडीत लपलेल्या अस्वलाने अचानक बाहेर येत त्यांच्यावर झडप घातली.

हा हल्ला एवढा अचानक होता की वेळीप यांना स्वतःचा बचाव करण्यास वेळच मिळाला नाही. त्यांच्या आरडाओरडीनंतर जवळच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली.

Bear Attacks
Bear Attacks:अळंबी आणण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला, धारगे - तांबडीसुर्ला येथील घटना

घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला कळविले. त्यानंतर प्रथम केपे प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळीप यांना दाखल करण्यात आले. मात्र, जखमांची तीव्रता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले आहे.

Bear Attacks
Bear Attacks Farmer: अस्वलाचा जीवघेणा हल्ला, तरीही जखमी शेतकऱ्याने 4 किमी चालत गाठलं घर; वाचा नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जंगल विभागाकडे अस्वल हुसकावून लावण्याची मागणी केली आहे. सध्या वेळीप यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com