Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?

जिथे तुम्ही दुर्गम समुद्रकिनाऱ्याजवळ (Beach) राहू शकता आणि जगाच्या गजबाजाटापासून दूर राहण्याचा आनंद घेवू शकता.
Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?
Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? Dainik Gomantak

गोवा (Goa) हे भारतातील एक छोटे राज्य असून पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. गोवा म्हंटले की डोळ्यासमोर बीचेस (Beach) , समुद्र, यासारख्या अनेक गोष्टी येतात. आज आम्ही तुम्हाला गोव्यातील एका सीक्रेट जागेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही दुर्गम समुद्रकिनाऱ्याजवळ राहू शकता आणि जगाच्या गजबाजाटापासून दूर राहण्याचा आनंद घेवू शकता. मोरजिम, उत्तर गोव्यातील माँटेगो बे बीच व्हिलेज (Montego Bay Beach Village) असे या ठिकाणाचे नाव आहे. येथे फक्त समुद्रांच्या लाटांचा आवाज, वेगवान वारे आणि आरामदायक समुद्रकिनारा तुम्हाला सुंदर अनुभव देईल.

* गोव्यातील मॉन्टेगो बे बीच व्हिलेज समुद्रकिनारा

हे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला एका नव्या जगत आल्यासारखे वाटेल. गोव्याचे हे सुंदर ठिकाण मोरजिममध्ये लपलेले आहे. येथील स्वागतार्ह वातावरणामुळे वेगळे आहे. हे हनिमूनर्स, मित्र, कुटुंबापासून अगदी पाळीव प्राण्यापर्यंत प्रत्येकासाठी स्वर्गाप्रमाणे वाटणारे हे ठिकाण आहे. हे ठिकाण पाळीव प्राण्यांसाठी एक अनुकूल निवासस्थान आहे जे गोव्यातील सर्वोत्तम हॉटेलपैकी एक आहे. मॉन्टेगो बे बीच व्हिलेजमध्ये, तुम्ही लॉग केबिन, आलिशान सूट किंवा आरामदायक बीच व्हीलामध्ये राहू शकता. येथे राहण्यासाठी तुम्हाला प्रती रात्र 4251 रुपये द्यावे लागतील.

Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?
Tour Guide: गोव्यातील हॉटेल्स का लोकप्रिय आहेत?

* समुद्रकिनाऱ्याजवळील टेंटमध्ये राहण्याचा अनुभव

येथे राहण्यासाठी पाच प्रकार आहेत. कुटुंबे कासा-दे-मुडांका(Casa-De-Mudanca) पाच एसी रूम असलेल्या मोठ्या बंगल्यामध्ये राहू शकता. रोमॅंटिक गेटवे शोधत असलेले जोडपे नारळाच्या झाडांनी वेढलेले सुंदर लोंग कॅबिनमध्ये राहू शकतात. येथे तुम्हाला जंगलातील केबिनचा अनुभव घेता येईल. येथे गार्डनचे दृश्य असलेले कॅबिन (Garden-View cabin), सुइट्स (Suites) आणि ग्रीक शैलीतील कॉटेज( Greek Style Cottage) देखील आहेत. समुद्र प्रेमी, समुद्रकिनाऱ्यावर राहण्याचा आणि निळ्या समुद्राचे विहंगम दृश्याचे आनंद घेवू शकतात. या ठिकाणी तुम्ही वाळूचे किल्ले बनवू शकता आणि मावळत्या सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य कॅमेरामध्ये जतन करू शकता.

* संगीत, स्वादिष्ट पदार्थ, कॉकटेल आणि खेळ

मॉन्टेगो बे बीच व्हिलेजमध्ये( Montego Bay Beach Village) तुम्ही तुमच्या हातात कॉकटेलचा ग्लास घेवून समुद्राच्याकिनारी आरामदायी दिवस घालू शकता. बीच व्हीलेजमध्ये एक सुंदर रेस्टॉरट आहे, तिथे तुम्ही इनडोअर गेम्स (Games) जसे कॅरम आणि पूलमध्ये स्वीमिंग करण्याचा आनंद घेवू शकता. येथे आठवड्यातून दोनदा लाइव्ह म्युझिकवर आपल्या जोडीदारासोबत किंवा मित्र0- मैत्रीणीसोबत डान्स करण्याचा आनंद घेवू शकता. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही फ्रेश सीफूड आणि लोकल स्वादिष्ट (Food) पदार्थांचा आस्वाद घेवू शकता. समुद्रकिनारा, गार्डन आणि राहण्याची उत्तम सुविधा असलेल्या गोव्यातील या सीक्रेट ठिकाणाला पुढच्या ट्रिपमध्ये भेट द्यायला विसरू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com