Goa Beach: भारतीय मात्सिकी सर्वेक्षण केंद्रीय आस्थापनातर्फे बायणा समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 19 या वेळात राज्यात 37 समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बायणा समुद्रकिनारा
बायणा समुद्रकिनाराDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अंतर्गत हेडलँड सडा येथील भारतीय मात्सिकी सर्वेक्षण मुरगाव या केंद्रीय आस्थापनातर्फे बायणा समुद्रकिनारा स्वच्छ करून या उपक्रमात भाग घेतला. शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 19 या वेळात राज्यात 37 समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

(Bayana Beach Cleaning Campaign by Central Establishment of Fisheries Survey of India)

बायणा समुद्रकिनारा
Football Pro-League| फुटबॉल निवडणूक 30 ऑक्टोबरला; जीएफए समितीचा निर्णय
बायणा समुद्रकिनारा
बायणा समुद्रकिनाराDainik Gomantak

केंद्रीय मंत्रालयाकडून आजादी का अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात गोव्यातील निरामार, बोगमाळो, बायणा, वेलसाव आणि कोलवा या पाच समुद्रकिनाऱ्यांच्या व्यतिरिक्त राज्यातील ३७ समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य सरकारी आस्थापना बरोबर केंद्रीय आस्थापनांनी भाग घेतला.

दरम्यान मुरगाव येथील भारतीय मात्सिकी सर्वेक्षण या केंद्रीय आस्थापनाने बायणा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करून या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग दाखविला. मुरगाव येथील भारतीय मात्सिकी सर्वेक्षण या केंद्रशासित आस्थापनाने कार्यकारणी अधिकारी डॉ. एस रामचंद्रन, कार्यालयीन सुप्रिडेन्ट श्रीमती के के अंबिका तसेच कार्यालयीन कर्मचारी जी ई लांगवान, मनोज वळवईकर, विनोद नाईक, संजय भालकर, संदीप कुशवा, दयानंद कुमार, नवनाथ बोरोलेकर, श्रीमती कुसुमलता यादव, यु एस यस प्रसाद व इतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहिमेत भाग घेऊन मोहीम यशस्वी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com