Bastora Panchayat : आजपासून अंमलबजावणी; बस्तोडा पंचायत करणार घरोघरांतून कचरा संकलन

ओला कचरा थेट साळगावांतील कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार ; 20 लाख खर्चून उभारलेल्या ‘एमआरएफ’ शेडचे
Bastora Panchayat
Bastora PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

MRF Shead Opening in Bastora : बस्तोडा पंचायतीने मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) शेडचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१८) लोकार्पण करण्यात आले. आज बुधवारपासून पंचायतीकडून घरोघरी जाऊन ओला तसेच सुका वर्गीकृत कचरा संकलित केला जाणार आहे.सुमारे २० लाख रुपये खर्चून ही ‘एमआरएफ’ सुविधा उभारली गेली आहे. कोमुनिदादच्या जागेत ही शेडची बांधली आहे.

यावेळी टिकलो यांच्यासोबत बार्देश तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रथमेश शंकरदास, सरपंचा अंजेला मार्टीन्स, उपसरपंचा सुनिता लोटलीकर, झेडपी सदस्या मनिषा नाईक,

गट विकास कार्यालयातील अधिकारी खुशाली हळर्णकर तसेच पंचायतीचे इतर पंचसदस्य, माजी सरपंच सावियो मार्टीन्स, माजी नगरसेवक फ्रॅकी कार्व्हालो हे उपस्थित होते.

ग्लेन टिकलो यांनी बस्तोडा पंचायतीच्या या उपक्रमाची स्तुती केली. सदर पंचायत अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा पुरवत असल्याचे ते म्हणाले. पंचायतीकडून गोळा केला जाणारा ओला कचरा थेट साळगावांतील कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Bastora Panchayat
IFFI Goa 2023: इफ्फीत आता नावाजलेल्या 'वेब सिरीज'लाही पुरस्कार, अनुराग ठाकूर यांची माहिती

वर्गीकृत कचराच सफाई कामगाराकडेच द्या !

सावियो मार्टीन्स यांनी प्रकल्पासंबंधीची माहिती दिली. लोकांनी वर्गीकरण केलेला कचराच सफाई कामगारांकडे द्यावा. दरदिवशी घरोघरी कचरा गोळा केला जाणार असून लोकांनी सहकार्य करून बस्तोडा पंचायत क्षेत्र कचरामुक्त ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंचायत क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटवर असलेला सुमारे १ टन कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. सध्या पंचायत दर दिवशी सुमारे ७०० किलो कचरा गोळा करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com