अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड; बार्देशसह डिचोलीत मर्यादित पाणी पुरवठा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुठे दरडी कोसळल्या तर कुठे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. पावसामुळे राज्यात मोठी वित्तहानी झाली.
अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड; बार्देशसह डिचोलीत मर्यादित पाणी पुरवठा
bardez and bicholim to restricted water supply on 13 14 july due to failure of treansformer at 30 mld water treatment plant in assonroaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात कुठे दरडी कोसळल्या तर कुठे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. पावसामुळे आतापर्यंत राज्यात मोठी वित्तहानी झाली आहे.

bardez and bicholim to restricted water supply
bardez and bicholim to restricted water supply Dainik Gomantak

दरम्यान, संपूर्ण बार्देश तालुक्यासह डिचोलीतील काही भागात पाणी पुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड निर्माण झाल्याने आज (शनिवारी) सकाळपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड; बार्देशसह डिचोलीत मर्यादित पाणी पुरवठा
Goa Weather Update : ‘मुसळधार’ने कोट्यवधींचे नुकसान; वाहतुकीवर परिणाम

प्रकल्पात बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवली असून, उद्यापर्यंत बार्देशसह डिचोलीत मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने जारी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण प्रकल्पाला जोडणाऱ्या वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com