Bangladeshi in Goa : गोव्यात बांगलादेशी नजरकैदेत की फार्स?

सध्या 40 जणांवर निर्बंध; यापूर्वीच्या पलायन घटनेमुळे कारवाईवर प्रश्‍न
bangladeshi in  goa
bangladeshi in goaDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladeshi in Goa : राज्यात दहशदवादविरोधी पथक व जिल्हा पोलिसांच्या वतीने बांगलादेशींची शोधमोहीम सुरू झाली आहे. आठवड्यात 40 पेक्षा अधिकजणांना प्रतिबंधात्मक अटक करून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणून पोलिस नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी दोन वर्षांपूर्वी अटक झालेले व पोलिस नजरकैदेत असलेले दोन बांगलादेशी फरारी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून बांगलादेशींना नजरकैदेत ठेवण्यात येत आहे की तो फार्स आहे?, असा संशय लोकांकडून व्यक्त होत आहे.

वाळपई, आगशी, डिचोली, कोलवा, जुने गोवे या भागातून एटीएसने व त्यानंतर जिल्हा पोलिसांनी मुस्लिम असलेल्या परिसरात केलेल्या तपासणीत काही बांगलादेशी गेली अनेक वर्षे बनावट आधार कार्ड, निवडणूक कार्ड तसेच इतर राज्यातील घरांच्या खोट्या पत्त्यासह गोव्यात वास्तव्य करून असल्याचे उघड झाले आहे. व्हिसा नसलेल्या किंवा व्हिसा मुदत संपलेल्या विदेशी नागरिकांची पाठवणी होईपर्यंत त्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी म्हापसा येथे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये काहीच सुविधा नसल्याने त्यांना पुढील कारवाई होईपर्यंत गोव्याबाहेर न जाण्याचे निर्देश पोलिसांनी दिली आहे. मात्र, आवश्‍यक असलेल्या मूलभूत गरजांचा अभाव आहे.

ताब्यात घेऊन निर्बंध लादून सुटका केलेल्या बांगलादेशींना त्यांच्या मुलाबांळासह ठेवण्याची सोय या केंद्रात नाही. तसेच या सर्वांचा खाण्यापाण्याचा प्रश्‍नही आहे. ते सविस्तरपणे व्हिसा घेऊन भारतात आलेले नाही तर त्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे त्यांची पाठवणी करण्यासाठी सर्वतोपरी माहिती जमा करण्यात येत आहे. बांगलादेशच्या राजदुतांशी संपर्क साधून या सर्वांची भारतातून पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

bangladeshi in  goa
Goa Crime : वडिलांच्या अपघाताचा बनाव; म्हापशात शाळेमधून विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न?

गोव्यातून फरार होण्याची शक्यता

विदेशी नागरिक असलेल्या बांगालदेशींना म्हापशातील स्थानबद्धता केंद्रात ठेवणे आवश्‍यक आहे. मात्र, केंद्रातील अपुऱ्या साधनसुविधेमुळे दंडाधिकारी त्यांना नजरकैदेत ठेवून व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित क्षेत्रातील पोलिसांना देतात. या बांगलादेशींवर निर्बंध असले तरी ते कामानिमित्त बाहेर जात असतात. त्यामुळे पोलिसांनाही त्यांच्यावर नजर ठेवणे मुष्किलीचे झाले आहे. निर्बंध असूनही ते गोव्यातून फरार होऊन इतर राज्यात जाऊन बस्थान मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कारवाई म्हणजे फार्स असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्र हे समाजकल्याण खात्याच्या अखत्यारित येते. या केंद्रात स्थानबद्ध असलेल्यांची सोय या खात्याने करणे आवश्‍यक आहे. सध्या या केंद्राची स्थिती केविलवाणी झाली आहे. सध्या असलेल्यांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहून एफआरआरओने त्यांना संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकाकडे सोपवून त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com