Banastarim Accident: खोटी माहिती, मद्याचा अंमल, १२१ साक्षीदार; 'बाणस्तारी अपघात' प्रकरणी १४ महिन्‍यांनी आरोपपत्र

Banastari Accident News: फोंडा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केलेल्या या आरोपपत्रात १२१ साक्षीदारांचा समावेश आहे. ६ ऑगस्ट २०२३ रोजी हा अपघात झाला होता.
Banastari Accident News: फोंडा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केलेल्या या आरोपपत्रात १२१ साक्षीदारांचा समावेश आहे. ६ ऑगस्ट २०२३ रोजी हा अपघात झाला होता.
Goa Banastarim AccidentCanva
Published on
Updated on

पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणी वाहनचालक परेश सावर्डेकर याच्यासह अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांच्याविरोधात पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हे शाखेने १ हजार १५८ पानांचे आरोपपत्र आज सादर केले. फोंडा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केलेल्या या आरोपपत्रात १२१ साक्षीदारांचा समावेश आहे. ६ ऑगस्ट २०२३ रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात तिघांना जीव गमवावा लागला असून चारजण गंभीर, तर अन्य चारजण किरकोळ जखमी झाले होते.

मद्याचा अंमल

या प्रकरणी वैभव शिरोडकर यांनी म्हार्दोळ पोलिसात तक्रार दिली होती. तपासकाम योग्य दिशेने होत नसल्याने तपासकाम गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. आरोपपत्रात म्हटले आहे, की परेश सावर्डेकर मद्याच्या अमलाखाली असल्याचे माहीत असूनही तो जीए - ०७ - के - ७३११ क्रमांकाची मर्सिडीज कार निष्काळजीपणे चालवत फोंड्याहून पणजीच्या दिशेने चालला होता.

घटनास्थळावरून पळ

बाणस्तारी पुलाजवळ समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकल आणि आल्टो कारला सावर्डेकरच्या कारची धडक बसली. या धडकेमुळे मोटारसायकलची धडक कारला बसली. त्यानंतर कारला ही मर्सिडीज कार धडकल्याने आल्टो कार वळून विरुद्ध दिशेने गेली आणि तिची धडक अन्‍य आल्टो कारला बसली. सावर्डेकर घटनास्थळाहून पळून गेला होता.

Banastari Accident News: फोंडा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केलेल्या या आरोपपत्रात १२१ साक्षीदारांचा समावेश आहे. ६ ऑगस्ट २०२३ रोजी हा अपघात झाला होता.
Saint Estevam Accident: सांतइस्तेव्‍ह प्रकरण! दुर्घटना की चित्रपटाची कथा? अनेक अनुत्तरीत प्रश्‍‍न

आरोपपत्रात काय?

सावर्डेकरने वाहन गणेश लमाणी चालवत होता, अशी खोटी माहिती पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. हा कट तिवरे येथे अत्रेय सावंत यांच्या निवासस्थानी शिजला.

परेश सावर्डेकर, अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर हे या कटात सहभागी होते.

कायदेशीर कारवाईपासून परेश याला वाचवण्यासाठी चालक गणेश लमाणी याला मर्सिडीजचा चालक म्हणून पुढे करण्यात आले. ही बाब लमाणी याने मान्य केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com