Goa: गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घाला, हिंदू जनजागृती समितीकडून 8 आमदारांना निवेदन

हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह राज्यातील विविध आमदारांना निवेदन सादर केले.
Hindu Janajagruti Samiti
Hindu Janajagruti Samiti Dainik Gomantak

Goa News: उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घालावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह राज्यातील विविध आमदारांना निवेदन सादर केले.

गोव्यात हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधने सर्वत्र लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.

अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 89 नुसार अन्नाचा दर्जा निश्चित करण्याचे दायित्व केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) आणि गोवा सरकारचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे आहे. केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे, असा आरोप समितीने निवेदनातून केला आहे.

या आमदारांनी दिले निवेदन

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, साळगावचे आमदार केदार नाईक, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना निवेदन सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com