Sunburn Goa: 'सनबर्न' गोव्यातून कायमचा हद्दपार करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने 23 नोव्हेंबर रोजी याबाबत उपजिल्हाधिकाऱ्याना एक निवेदन दिले आहे.
Sunburn Goa
Sunburn Goa
Published on
Updated on

Sunburn Goa: ‘सनबर्न’ महोत्सवामुळे गोव्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे ‘सनबर्न’/‘ईडीएम’ सारखे फेस्टिव्हल गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सँड्रा डिसोझा यांच्याकडे केली.

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने 23 नोव्हेंबर रोजी याबाबत उपजिल्हाधिकाऱ्याना एक निवेदन दिले आहे. यावेळी भारत माता की जय संघटनेचे रामदास सावईवेरेकर, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक गोविंद चोडणकर, सुशांत दळवी, दिलीप शेट्ये, अशोक हळदणकर आणि प्रतिभा अशोक हळदणकर उपस्थित होते.


गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे 28 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न 2023’चे आयोजन केले आहे. 2009 मध्ये कांदोळी समुद्रकिनारी झालेल्या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये नेहा बहुगुणा या 23 वर्षीय युवतीचा, वर्ष 2014 मध्ये कांदोळी समुद्रकिनारी झालेल्या ‘सुपरसोनिक’ या अशाच प्रकारच्या फेस्टिव्हलमध्ये मुंबईस्थित फॅशन डिझायनर ईशा मंत्री या युवतीचा, तसेच ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये अन्य काही युवकांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. अमली पदार्थाच्या अतीसेवनाने हे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

समाजस्वास्थ्याला हानीकारक असलेल्या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलचे आयोजन देवभूमी गोव्यात होत आहे. ‘सनबर्न’सारखे ‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही.

‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे हे आपले दायित्व आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com