Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

Goa Crime News: रेड कॉर्नर नोटीसनंतर रियाध पोलिसांनी संशयित बरकत ताब्यात घेऊन इंटरपोलच्या माध्यामतून सीबीआयला कळवले.
Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक
Arrest|Jail|CrimeCanva
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०११ बाळ्ळी जाळपोळ प्रकरणातील संशयिताला अटक केलीय. विभागाने सौदी अरेबियातून संशयित बरकत अलीला अटक केली.

बरकत अली आठ वर्षापासून फरार होता सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे तो स्थायिक झाला होता. २०११ साली बाळ्ळीत झालेल्या जाळपोळ घटनेत दोन आदीवासी युवकांनी जीव गमावला होता.

बरकत अली विरोधात लुकआऊट आणि रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. रेड कॉर्नर नोटीसनंतर रियाध पोलिसांनी संशयित बरकत ताब्यात घेऊन इंटरपोलच्या माध्यामतून सीबीआयला कळवले.

रियाध पोलिसांना बरकतला भारतात पाठवल्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली. बरकत अलीला दक्षिण गोवा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

२०११ साली बाळ्ळी - केपे येथील उटाच्या आंदोलनात बरकत अली सहभागी होता. यासंबधी समोर आलेल्या फोटोत तो दिसत असल्याचे सीबीआयने म्हटले. तसेच, तपासात तो सहकार्य करत नसल्याने सीबीआयने म्हटले होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर यात दोन आदिवासी तरुणांचा मृत्यू झाला होता.

Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक
Allu Arjun: गोव्यात खरंच दारु खरेदी केली का? सात वर्षानंतर सुपरस्टार अल्लु अर्जुनने सांगितले Viral Video मागील सत्य

बाळ्ळी जाळपोळ प्रकरणाशी संबधित नऊ केस राज्य सरकारने सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपत्रात संशयित बरकत अलीचे देखील नाव होते. सीबीआयने बरकत अलीसह इतरांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, १४८, ३०४ (II), ४२७, ४३६ आणि १४९ अंतर्गत गुन्हा नोंद केला.

२०२२ साली न्यायालयाने फरार संशयित बरकत अली याला वगळून इतर संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

२०११ साली उटाच्या वतीने बाळ्ळी जंक्शन, केपे येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग १७ अडवला. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती करुन देखील आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत. आंदोलनाला हिंसक वळण लागले व जाळपोळ करण्यात आली. यात दोन आदीवासी तरुणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com