VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Parasailing Cable Snaps Mid-Air at Baga Beach: गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर पर्यटनाचा आनंद लुटत असताना एका पर्यटकाच्या बाबतीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.
Parasailing Cable Snaps Mid-Air at Baga Beach
Parasailing Cable Snaps Mid-Air at Baga BeachDainik Gomantak
Published on
Updated on

बागा: गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर पर्यटनाचा आनंद लुटत असताना एका पर्यटकाच्या बाबतीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आकाशात उंच भरारी घेत पॅरासेलिंगचा आनंद घेत असताना अचानक पॅरासेलिंगची दोरी तुटली. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, बचाव पथकाच्या तत्परतेमुळे या पर्यटकाला वेळीच सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

भर आकाशात मृत्यूचा तांडव

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक बागा बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत होता. पॅरासेलिंगद्वारे तो हवेत अनेक फूट उंचीवर असताना अचानक बोटीला जोडलेली मुख्य दोरी तुटली. दोरी तुटताच हवेच्या प्रवाहामुळे पॅराशूट अनियंत्रित झाले. यावेळी सर्वत्र किंकाळ्या आणि गोंधळ ऐकू येत होता.

Parasailing Cable Snaps Mid-Air at Baga Beach
Goa Road: हॉटमिक्‍स डांबरीकरणानंतर 5 वर्षे रस्‍ते खोदाईस बंदी! नोडल प्राधिकरणाची स्‍थापना; अधिसूचना जारी

पॅरासेलिंगची केबल तुटल्याचे लक्षात येताच वॉटर स्पोर्ट्स चालकांनी क्षणाचाही विलंब न लावता हालचाली सुरू केल्या. पॅराशूट पाण्यात पडल्यानंतर तातडीने पर्यटकाला बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत पर्यटकाला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Parasailing Cable Snaps Mid-Air at Baga Beach
Goa Crime: कौटुंबिक वादाचा भडका, मयेत सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; संशयिताला बेड्या

वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे गोव्यातील वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या उपकरणांची नियमित तपासणी होते का? निकृष्ट दर्जाच्या केबल्स वापरल्या जात आहेत का? असे प्रश्न स्थानिक आणि पर्यटकांकडून विचारले जात आहेत.

सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही, परंतु पर्यटनाच्या नावाखाली होणारा हा निष्काळजीपणा भविष्यात महाग पडू शकतो. पोलीस आणि पर्यटन विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित ऑपरेटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com