Panaji Smart City: स्मार्ट सिटीची दैना! अवघ्या सहा महिन्यात रस्ते उखडले; दिसू लागला जुन्या डांबराचा थर

Panaji Roads: पावसाळ्यात अनेक रस्ते खराब झाले. मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदकाम केलेले खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चेंबरच्या भोवतालची जागा उखडली गेली.
Panaji Roads: पावसाळ्यात अनेक रस्ते खराब झाले. मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदकाम केलेले खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चेंबरच्या भोवतालची जागा उखडली गेली.
Panjim Road NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Smart City Panjim Poor Road Condition

पणजी: पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पणजीतील खराब झालेल्या रस्त्यांवर हॉटमिक्स डांबरीकरणाचा थर टाकण्यात आला होता. परंतु तो थर उखडून गेला असून त्याखाली दडलेला पूर्वीचा डांबरीकरणाचा थर सध्या दिसत आहे. यावरून हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम किती मजबूत होते, हे दिसून येते.

राजधानी पणजीला खराब रस्त्याचा जणू शापच आहे. शनिवार-रविवार सोडल्यास इतर दिवसांत दररोज सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक वाहनांची राजधानीत ये-जा होत असते. गतवर्षी जी-२०च्यावेळी राजधानीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांच्या मध्यभागी चेंबरसाठी खोदकाम करण्यात आले. मे महिन्यापर्यंत अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती.

Panaji Roads: पावसाळ्यात अनेक रस्ते खराब झाले. मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदकाम केलेले खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चेंबरच्या भोवतालची जागा उखडली गेली.
Panjim Smart City: पणजीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'ई बसेस'वर विश्वास! गोवा सरकारने तयार केला प्रस्ताव

पावसाळ्यात अनेक रस्ते खराब झाले. मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदकाम केलेले खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चेंबरच्या भोवतालची जागा उखडली गेली. पावसातही संबंधित यंत्रणेने ते खड्डे काँक्रिटिकरणाने भरले, पण हा उपायही तात्पुरती मलमपट्टी ठरली. मे महिन्यात सांतिनेजमधील विवांता हॉटेलजवळील रस्ता, दूरदर्शनसमोरील रस्ता तसेच मळ्यातील तांबडीमाती ते धनलक्ष्मी सोसायटीपर्यंतचा रस्त्यावरील काही अंतरांचे डांबरीकरण करण्यात आले होते, ते आता नाहीसे होत आले आहे. कारण पूर्वीच्या डांबरीकरण असलेल्या रस्त्यावर केवळ हॉटमिक्सचा थर टाकण्याचे काम झाले असल्याचे दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com