Goa Election 2022: पर्रीकर कुटुंबाबद्दल मला खूप आदर : मोन्सेरात

बाबूश यांच्या निवडणूक प्रचाराला पणजीमधून सुरुवात
Panjim MLA Babush Monserrate
Panjim MLA Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी मतदारसंघातून भाजप उमेदवारी जाहीर झालेले आमदार आतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी काल सकाळी महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या या प्रचारावेळी भाजपचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या निवडणूक भरारी पथकाने लोकांना पांगवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम ठरले. (Babush Monserrate statement about Parrikar family on goa election)

Panjim MLA Babush Monserrate
Goa Election 2022 : गोव्यात महिला काँग्रेसचे देवदेवतांना साकडे

बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पणजीतून निवडणूक (Goa Assembly Election) प्रचार सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती. मात्र आदल्या दिवशी त्यांनी ही घोषणा स्थगित करत असल्याचे जाहीर केले होते. अधिकृत उमेदवारी मिळाल्यावरच प्रचाराला सुरुवात करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी उमेदवारी जाहीर होताच आज सकाळी 8.30 वाजता मोन्सेरात पणजीत (Panjim) श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आले. त्यावेळी त्यांचे चाहते, समर्थक तसेच कार्यकर्ते अगोदरच मोठ्या संख्येने उपस्थित होते. पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत नेहमी असणारे बहुतेक कार्यकर्ते आज त्यांच्या प्रचारात सामील झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मोन्सेरात म्हणाले, आगामी निवडणुकीत तिसवाडी तालुक्यात सर्व जागा भाजपला मिळाव्यात तसेच माझ्या प्रचारात यश मिळण्यासाठी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

विजयाची खात्री असल्यानेच उमेदवारी

ही लोकशाही असल्याने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात उत्पल पर्रीकर हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. पर्रीकर कुटुंबाबद्दल मला खूप आदर आहे. पणजीतील उमेदवारी ही पक्षाने माझ्या विजयाची खात्री असल्यानेच दिली आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. पणजी मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो, असे बाबूश मोन्सेरात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com