गोव्यातील रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनात लवकरच वाढ

खासगी कंपन्यांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्याचे कामगार आयुक्तांना निर्देश
Babush Monserratte
Babush MonserratteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा राज्यातील रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनात लवकरच वाढ करणार असल्याची घोषणा कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे. गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याचं मोन्सेरात यांनी स्पष्ट केलं आहे. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यातील बेरोजगारीचा मुद्दा चांगलाच पेटला होता.

गोव्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांनी कामांचा धडाकाच लावला आहे. याचाच एक भाग म्हणून कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी खासगी कंपन्यांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्याचे कामगार आयुक्तांना निर्देश दिले आहेत. गोव्यातील बेरोजगारी कमी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचे संकेतही बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहेत.

Babush Monserratte
प्रतापसिंग राणे यांना दिला अखेर कॅबिनेट दर्जा

नुकतीच बाबुश मोन्सेरात यांनी फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देत ‘स्टार्टअप’शी संवाद साधला. मंत्री मोन्सेरात यांनी महाविद्यालय स्थित फोरम फॉर इंकुबेशन, रिसर्च ॲण्ड एन्टरप्रनरशीप केंद्राला भेट दिली.

गोव्यात स्टार्टअपच्या कार्यक्षेत्रात जास्त सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या अनुदानात वाढ करणे क्रमप्राप्त ठरते, असे मंत्री मोन्सेरात यांनी यावेळी स्पष्ट केलं. या केंद्रामधील उपक्रमांची त्यांनी माहिती करून घेतली. मंत्री मोन्सेरात यांनी प्रोटोटाईपिंग प्रयोगशाळेला भेट देऊन थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. एकंदरितच बाबूश यांनी आपल्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांमध्ये कामाचा सपाटाच लावल्याचं दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com