Babush Monserrate Case: सुनावणीस कायम गैरहजर राहू द्या! बाबूश-जेनिफरचा अर्ज

Babush Monserrate Case: पणजी पोलिसस्‍थानक हल्‍लाप्रकरणी मागणी
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrate Case: 2008 साली घडलेल्‍या आणि अद्याप न्‍यायालयात प्राथमिक अवस्‍थेतच रेंगाळलेल्या पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणाच्‍या सुनावणीस आपल्‍याला कायमस्‍वरूपी गैरहजर राहण्‍याची परवानगी द्यावी, यासाठी महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या पत्‍नी आमदार जेनिफर मोन्‍सेरात यांनी अर्ज केला आहे. या अर्जावर सीबीआयचे म्‍हणणे ऐकून घेण्‍यासाठी ही

Babush Monserrate
Forest Department: वन हक्क प्रश्‍न सोडविण्यासाठी स्थानिकांचेच सहकार्य महत्त्वाचे

सुनावणी 12 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. या प्रकरणात मोन्‍सेरात दाम्‍पत्‍यासह एकूण 37 संशयित आरोपी असून दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी सुरू आहे.

मोन्‍सेरात हे ताळगावचे आमदार असताना पणजी पोलिसांनी आपल्‍या समर्थकांना अटक केल्याचा जाब विचारण्‍यासाठी बाबूश समर्थकांसह पणजी पोलिस स्‍थानकावर चाल करून आले हाेते. त्‍यावेळी मोन्‍सेरात समर्थकांनी पोलिसांवर हल्‍ला करीत स्‍थानकाची नासधूसही केली होती.

यापूर्वीही मोन्‍सेरात यांनी या सुनावणीस गैरहजर राहण्‍याची परवानगी मागितली होती. मात्र, त्‍यावेळी सीबीआयने हरकत घेतल्‍याने ही सवलत दिली नव्‍हती.

एका संशयिताच्‍या वतीने या प्रकरणाचे तपास अधिकारी तत्‍कालीन पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांची उलट तपासणी पुन्‍हा घेण्‍यासाठी न्‍यायालयासमोर अर्ज केला असता, सीबीआयच्‍या वकिलांनी त्‍याला हरकत घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com