'मिळणारा प्रतिसाद पाहता मी भारावून गेलो'

राज्यातून आतापर्यंतचे सर्वांचे लीड यामुळे तोडले जाईल; बाबू कवळेकर
Babu Kavlekar
Babu KavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील (goa) 40 जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात आज एकाच टप्प्यात मतदान झाले. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत गोव्यात 11.04 टक्के मतदान झाले. सकाळी 11 पर्यंत हा आकडा 26.63% पर्यंत वाढला. दुपारी 1 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला. तसेच त्याच वेळी, संध्याकाळी 6 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला. गोव्यात 5 वाजेपर्यंत 75.29% मतदान पार पडले.

Babu Kavlekar
फातोर्डा मतदारसंघात जनतेचा काैल कोणाला?

दरम्यान, केपे मतदारसंघातील भाजपचे (BJP) उमेदवार बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज बूथच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली धावपळ, प्रचारावेळी मिळणारा प्रतिसाद हे पाहता मी भारावून गेलो. राज्यातून आतापर्यंतचे सर्वांचे लीड यामुळे तोडले जाईल असा मला विश्वास असल्याच यावेळ ते बोलले. आता 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीत जनता कोणाला स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Intelligent Traffic Management System
Goa casino licence Rules
Goa FDA Food Inspection
Goa High Court Double Murder Acquittal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com