Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Goa Politics: पेडणे पोलिसांनी त्यांच्या दबावाखाली या प्रतिमा जाळणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे आजगावकर म्हणाले.
Babu Ajgaonkar
Babu AjgaonkarX
Published on
Updated on

पेडणे: माझे कितीही पुतळे करून जाळले तरी २०२७ ची विधानसभा निवडणूक मी लढवणारच. माझा प्रतिकात्मक पुतळा करून जाळणाऱ्यांविरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या युवकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलिसांनी परिणामास सज्ज रहावे, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत धारगळचे पंचायत सदस्य अर्जुन कानोळकर, कृष्णा तळवणेकर, नारायण तळकटकर उपस्थित होते. बाबू आजगावकर पुढे म्हणाले, की प्रतीकात्मक पुतळा जाळणारे युवक बेकार आहेत, त्यातील काहीजण अनैतिक व्यवसायात गुंतलेले आहेत.

आमदार आर्लेकर यांनी या युवकांचा वाईट कामांसाठी उपयोग करून न घेता या नऊपैकी किमान चारजणांना तरी रोजगार मिळवून द्यावा. पक्षाचे अध्यक्ष दामू नाईक यांनी आम्हा दोघांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा आदेश मानून मी गप्प राहण्याचे ठरवले होते, पण प्रदेशाध्यक्षांनी इशारा दिलेला असतानाही आमदार आर्लेकर यांनी आपले उद्योग सुरूच ठेवले आहेत.

प्रतिमा जाळणारे युवक आपला आमदार आर्लेकर यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचे सांगतात. तसे असेल तर आमदार व मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या युवकांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यास सांगावे. आमदार आर्लेकर प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करतात. पेडणे पोलिसांनी त्यांच्या दबावाखाली या प्रतिमा जाळणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे आजगावकर म्हणाले.

Babu Ajgaonkar
Babu Ajgaonkar: विधानसभा निवडणूक पेडण्यातून लढवणार

‘माझ्यामुळे मतदारसंघात विविध सुविधा’

ज्यावेळी मी धारगळ मतदारसंघात आलो, तेव्हा या मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा नव्हत्या. या सोयी सुविधा मी निवडून आल्यावर उपलब्ध करून दिल्या. पेडणे नगरपालिकेची इमारत, बाजार प्रकल्पाची इमारत या कामांना मंजुरी मिळविली. त्याची पूर्तता आमदार आर्लेकर यांनी केली नाही. त्यामुळे मोपा विमानतळ, आयुष्य इस्पितळात स्थानिकांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत, असेही आजगावकर म्हणाले.

Babu Ajgaonkar
Babu Ajgaonkar : "पक्षाने तिकीट दिले नाही तर"... बाबू आजगावकर यांची मोठी घोषणा

नऊ युवकांविरोधात पोलिसात तक्रार

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा बेकायदेशीररीत्या प्रतीकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी ९ युवकांविरुद्ध पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात रणजीत परब, हळर्ण, अजित सातार्डेकर, नानेरवाडा - पेडणे, प्रसाद आत्माराम परब, मोपा, विजय मोपकर, मोपा, प्रसाद देविदास, कासारवर्णे, भूषा नर्से, भटवाडी - कोरगाव, नवसो कशालकर, नानेरवाडा - पेडणे, सिद्धार्थ पोळजी, भाईडवाडा - कोरगाव, अभिजित शेट्ये, देऊळवाडा - वझरी व पांडुरंग नाईक, तळर्ण या युवकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com