Baba Ramdev In Goa: 'गोमातेचे रक्षण हेच मानवजातीचे आद्य कर्तव्‍य' -योगगुरू रामदेवबाबा

सिकेरीतील गोमंतक गोसेवा महासंघाच्या गोशाळेला स्वामी बाबा रामदेव यांनी भेट देऊन या गोशाळेचे दाते व गोसेवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Baba Ramdev In Goa
Baba Ramdev In GoaDainik Gomantak

Baba Ramdev In Goa: गोमाता ही पर्यायाने मानवजातीची माता असल्याने तिचे रक्षण व पालन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असून या अनुषंगाने सिकेरी-पैरा,मये येथील गोशाळेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून या गोशाळेचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून गायींचे पालन व रक्षण करण्याचा दृढ संकल्प करावा, असे प्रतिपादन स्वामी रामदेव बाबा यांनी सिकेरी येथे केले.

सिकेरीतील गोमंतक गोसेवा महासंघाच्या गोशाळेला स्वामी बाबा रामदेव यांनी भेट देऊन या गोशाळेचे दाते व गोसेवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर सदगुरू श्री स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य, राज्य पशु संवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच दिलीप शेट, भारत स्वाभिमानचे राज्य अध्यक्ष कमलेश बांदेकर, एन.पु. सिंह. पोपटराव, परमार्थ गुरूजी व इतरांची उपस्थिती होती.

Baba Ramdev In Goa
Baba Ramdev in Goa: गोवा हे योगसाधनेसाठी अत्यंत योग्य ठिकाण!

अल्प संसाधन वापरून आसाधारण कार्य करणारे कमलाकांत तारी, कमलेश बांदेकर यांचे कार्य महान असून ही गोशाळा देशातील एक आदर्श गोशाळा असल्याचे स्वामी पुढे म्हणाले. मानवाचा वाढत्या हस्तक्षेपामुळे आज पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले असून गोमाताही विविध रोगांनी पिडीत आहे.

गायीत सर्व देवतांचा वास असून मानवी सेवेपेक्षा गोमातेची सेवा श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले. गोमातेमध्ये धरतीमातेचे व पर्यायाने जगाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असून या आपल्या कर्तव्यापासून गोमाता कधीच मागे हटणार नाही.

गोमातेच्या श्रेष्ठत्वाला सर्व थरातून मान्यता प्राप्त आहे. गोमातेची सेवा व तिच्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांचा सदैव उध्दार व कल्याण गोमातेने केले आहे. त्यासाठी रस्त्यावर गोमाता फिरू नये व तिला सन्मान मिळावा यासाठी, आपण काम केले पाहिजे, असे रामदेवबाबा म्हणाले.

घराघरांत गोपालन व्हावे, असा पंतप्रधान मोदी यांचा मानस असून त्याची इच्छा पूर्ण करून आदर्श गोवा निर्माण करायचा आहे, असे ते म्हणाले.

गोपूजन, वृक्षारोपण व विविध प्रकल्पांचे उद्‍घाटन केले.

डॉ गोविंद काळे यांनी गोमातेशी संबंधित पुरातन काळापासूनच्या माहितीचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या हस्ते कमलाकांत तारी, कल्पिता तारी सन्मान करण्यात आले.

गोवाभर गोशाळा हव्या

केवळ हिंदुत्वाच्या घोषणा देऊन होणार नाही, त्यासाठी प्रभावी कार्यही करायला हवे. या राज्याला लाभलेल्या राष्ट्रीय विचारांच्या सरकारात असलेल्या सर्व हिंदूमंत्री व आमदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये गोशाळा सुर केल्या पाहिजेत.

सर्वांनी गोवंश संरक्षणाचा विडा उचलावा. तेव्हाच या कार्याला चांगले बळ मिळणार, असे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com