उच्च न्यायालय न्यायमूर्तीपदी बी. पी. देशपांडे यांची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफरशीनंतर बी. पी. देशपांडे यांची न्यायमूर्तीपदासाठी नियुक्ती होणार
B P Deshpande has been recommended as high court justice
B P Deshpande has been recommended as high court justiceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली आहे. या शिफरशीनंतर त्यांची न्यायमूर्तीपदासाठी नियुक्ती होणार आहे.

B P Deshpande has been recommended as high court justice
Goa: 'भंडारी समाजाला 19 टक्के विशेष आरक्षण देण्यात यावे'

नागपूर येथे 1962 साली जन्मलेले न्यायमूर्ती देशपांडे यांनी वाणिज्य पदवीधर व त्यानंतर कायद्याची पदवी घेतल्यानंतर 1987 मध्ये वकील व्यवसाय सुरू केला. त्यांनी अनेक वर्षे नागपूरमध्ये वकिली केली. त्यांनी विविध न्यायालये तसेच उच्च न्यायालयात वकिली केली होती. 1996 साली त्यांची गोव्यात वरिष्ठ विभाग नागरी न्यायाधीश म्हणून निवड झाली व त्यांची फोंडा येथील न्यायालयात वर्णी लागली.

B P Deshpande has been recommended as high court justice
नवे सरकार येईपर्यंत कसिनो मांडवीतच!

2002 मध्ये त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशपदी बढती मिळाली, तर 2014 मध्ये त्यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी बढती मिळाली होती. त्यांनी उत्तर व दक्षिण गोव्यात या पदावर काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अंमलीपदार्थ विशेष न्यायालय, बाल न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे. त्यांना बास्केटबॉल खेळाची आवड होती व त्यांनी नागपूर विद्यापीठातर्फे या खेळात तीन वर्षे प्रतिनिधित्व केले होते. न्यायालयीन कामकाजाच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही शिफारस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com