माझी बायको आजारी हाय, गावाला जायला पैसं न्हायतं; कामगारांनी मांडली कैफियत

धारगळ येथील आयुष हॉस्पिटल इमारतीचे (AYUSH Hospital Buildings) बांधकाम कारणाते कंत्राटदार संतोष यादव (Santosh Yadav) यांनी एकूण 7 कामगाराना 25 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर या दरम्यान कामगारांना नियुक्त केले होते.
 Workers
WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

माजी बायको आजारी आहे, मला गावाला जायचे आहे, माझ्याकडे खायला आणि बस साठी पैसे नाहीत. ही कैफियत आहे धारगळ (Dhargal) येथील आयुष्य हॉस्पिटल बांधकाम करणारऱ्या कामगाराची. धारगळ येथील आयुष हॉस्पिटल इमारतीचे (AYUSH Hospital Buildings) बांधकाम कारणारे कंत्राटदार संतोष यादव (Santosh Yadav) यांनी एकूण 7 कामगाराना 25 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर या दरम्यान कामगारांना नियुक्त केले होते. कंत्राटदाराने काम करून घेतले मात्र हक्काचा पगार द्यायला ते टाळाटाळ करत असल्याबद्दल सातही कामगारांनी संयुक्तरीत्या 30 रोजी पेडणे पोलिसाना लेखी स्वरूपात तक्रार देवून आमचा पगार मिळवून देण्याची विनंती केली आहे. यातील एका कामगाराची तर पत्नी आजारी आहे. आणि त्याला बिहारमध्ये जायचे आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत. म्हणून तो पगार मागण्यासाठी कंत्राटदाराकडे गेला होता. मात्र त्यांनी पगार देण्यास टाळाटाळ केली. अशी कैफियत कामगारांनी 30 रोजी तक्रार दिल्यानंतर पत्रकाराना मांडली. कंत्राटदाराकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याना फोन बंद येतो. या कामगाराना परत आपल्या गावाला जायचे आहे. परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याने अडचणी येतात.

 Workers
Goa: सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गास सुरक्षा मंडळाकडून हिरवा कंदील

कंत्राटदार कामगाराना म्हणतो कि आपल्याला अजून कामाचे पैसे मिळाले नाही. पैसे मिळाले थोडे ते इतराना दिले, आल्यावर तुम्हाला देतो असे कंत्राटदार सांगतो अशी माहिती कामगारांनी दिली. यापूर्वी 22 कामगार असेच गावाला गेले त्यानाही पगार दिला नाही, आता आम्हाला तो म्हणतो हे दहा हजार घ्या आणि 7 मजूर चला गावाला, पैसे पाठवून देतो. परतू आम्हाला त्याचा विश्वास नाही, तो पैसे देणार नाही म्हणून आम्ही तक्रार दिली आहे. काही कामगार रडत रडत गेले. आम्ही 10 दिवसा काम केल्यावर 10 दहा दिवसाचे पैसे द्या असे सांगितले होते, त्यांनी मान्य केले होते. परंतु आता पैसे देत नाही, तुमच्याकडे होते ते करा अशी कामगारांना धमकी दिलेली आहे. कामगारानी भयभीत होवून पोलिसांकडे धाव घेतलेली आहे.

आपली बायको मेली तर आपण आयुष्यातून संपणार अशी कैफियत एका कामगाराने मोठमोठ्याने रडून मांडळी, आम्ही आता पोलिसांचा सहारा घेवून कायद्याने हक्काचा पगार घेणार असे कामगारांनी सांगून पोलिसांनी आता आम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com