Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना ही ऐतिहासिक महत्त्वाची घटना : चंद्रकांत बाबू

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी रामभक्त कित्येक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण जवळ येऊन पोचला आहे.
Cape
CapeDainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir : केपे, अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लाच्या नूतन मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना हे सर्व भक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे, असे माजी मुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी सांगितले.

आंबावाली येथील गणपती मंदिरात अयोध्येहून आणलेल्या अक्षता व श्रीरामाची प्रतिमा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोहित धामसेकर, सूजन गांवस, देवस्थान समिती सदस्य उमेश गावकर, राजू गांवकर, रायू गांवकर, उल्हास गांवकर, रामनाथ नाईक, अभय च्यारी, महेद्र करमलकर, शैलेश जोशी, मनोज करमलकर आदी हजर होते.

अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी रामभक्त कित्येक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण जवळ येऊन पोचला आहे.

Cape
Goa Updates 4 January 2024: गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी घ्या जाणून...

२२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात जाणे शक्य नसले तरी सर्वांनी आपल्या घरी हा उत्सव साजरा करावा. सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे कवळेकर यांनी सांगितले. यावेळी रोहित धामसेकर यांनी माहिती दिली. रामनाथ नाईक यांनी विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com