Ayodhya Kar Sevak : पणजीत आज होणार कारसेवकांचा सन्मान

Ayodhya Kar Sevak : जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज खास रविवारी (ता.१८) पणजीच्या कला अकादमीमध्ये सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरावर होणाऱ्या ७५० श्रीराम जन्मभूमी कारसेवकांच्या सन्मान समारोहाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत.
Panaji
PanajiDainik Gomantak

Ayodhya Kar Sevak :

दाबोळी, अयोध्येतील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांचे आगमन शनिवारी (ता.१७) सायंकाळी दाबोळी विमानतळावर अयोध्येहून आगमन झाले.

गोवा समितीतर्फे त्यांचे आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष दिनेश पाटील, मार्गदर्शक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, कार्यक्रमाचे संयोजक नितीन फळदेसाई यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. सोबत अधिकारीवर्ग संदीप पाळणी, सूर्यकांत गावस, कृष्णराव बांदोडकर हेही उपस्थित होते. विमानतळ प्रवेद्वाराबाहेर येताच ५० सुवासिनींनी स्वामीजींची ओवाळणी केली.

जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज खास रविवारी (ता.१८) पणजीच्या कला अकादमीमध्ये सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरावर होणाऱ्या ७५० श्रीराम जन्मभूमी कारसेवकांच्या सन्मान समारोहाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत.

Panaji
Goa Crime News: चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी; कर्नाटकातील टोळी अटक

श्री रामजन्मभूमी कारसेवक सन्मान समिती, गोवातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी ‘श्रीरामजन्मभूमी लढ्यात परशुरामभूमी गोव्याचा सहभाग’ या ग्रथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे.

पू. परमहंस आचार्यजींच्या बरोबर श्री श्री वराह पीठाधीश्वर महंत श्री श्याम नारायण दासजी महाराज, आझमगढही अयोध्येहून आले आहेत. सुमारे २०० रामभक्तांचा जमाव स्वामीजींच्या स्वागतासाठी विमानतळावर जमला होता. उपस्थितांत आयोजक आनंद गुरव, साईनाथ नाईक, विनय नाईक, मारुती करमली आदी कार्यकर्ते होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com