Goa Crime News: चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी; कर्नाटकातील टोळी अटक

Crime News : १२ ते १३ फेब्रुवारीच्या दरम्यान वेर्णा स्मशानभूमीजवळ संशयितांनी तक्रारदाराच्या बसची बॅटरी चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
police arrested  suspects
police arrested suspectsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News

वेर्णा पोलिसांनी चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीला पकडले. ही कारवाई वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

चोरट्यांकडून चारचाकी वाहनांच्या १ लाख रुपयाच्या आठ बॅटऱ्या हस्तगत केल्या. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोवा-वेर्णा येथील मारियानो कार्व्हालो यांच्या लेखी तक्रारीनुसार, १२ ते १३ फेब्रुवारीच्या दरम्यान वेर्णा स्मशानभूमीजवळ संशयितांनी तक्रारदाराच्या बसची बॅटरी चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

police arrested  suspects
Illegal Tree Cutting: साकोर्डात खैरच नव्हे सागवान झाडांचीही कत्तल; ग्रामस्थांकडून माहिती

त्यानुसार शुक्रवारी एका कारवाईत राम राठोड, सागर राठोड आणि सचिन लमाणी (सर्व राहणारे साई विहार पाले-वेळसाव तसेच मूळ कर्नाटक-बागलकोट) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चारचाकी वाहनांच्या आठ बॅटऱ्या हस्तगत केल्या व त्यांना अटक करण्यात आली. वेर्णा पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com