'एचआयव्ही एड्स' विरोधात डिचोलीत पथनाट्याद्वारे जनजागृती

एड्स टाळा, सुखी आणि सुरक्षित जीवन जगा, असा संदेश देत आज (बुधवारी) डिचोलीत एड्स विरोधी जागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
Bicholim  'एचआयव्ही एड्स' विरोधात डिचोलीत पथनाट्याद्वारे जनजागृती
Bicholim 'एचआयव्ही एड्स' विरोधात डिचोलीत पथनाट्याद्वारे जनजागृतीDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: Bicholim एड्स टाळा, सुखी आणि सुरक्षित जीवन जगा, असा संदेश देत आज (बुधवारी) डिचोलीत एड्स विरोधी जागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहकार्याने आणि स्वाती साळगावकर यांच्या नेतृत्वाखालील मेरशीच्या कलाकार ग्रुपतर्फे या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

Bicholim  'एचआयव्ही एड्स' विरोधात डिचोलीत पथनाट्याद्वारे जनजागृती
कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

सकाळी शहरातील कदंब बसस्थानक आणि नंतर बाजारातील गणपती पूजन मंडपात कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यातून 'एड्स'ची लागण कशी होते. त्याबद्दल तसेच एड्स टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. एड्सची लागण झालीच, तर कोणती उपाययोजना करावी. याबद्दल उपयुक्त माहिती देण्यात आली. एड्सचा रुग्ण असल्याचे समजल्यास समाजाने त्याला वाळीत टाकू नये. असे आवाहनही या कलाकारांनी केले. दोन्ही ठिकाणी सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

E20 Petrol Mileage
Goa Rakshan Yatra
Goa Samagra Shiksha Walk In Interview
Reis Magos Gram Sabha case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com