Clay Pots : आरोसीची सिमोनी बनविते मातीची आकर्षक भांडी

प्रचंड मागणी : आरोग्‍यासाठी लाभदायक; मिळतात अनेक जीवनसत्वे; उन्‍हाळ्‍यात भांडी खरेदीसाठी उडते झुंबड
Clay Pots
Clay PotsDainik Gomantak
Published on
Updated on

जुन्या काळातील लोक मातीच्या भांड्यात जेवण शिजवत असत. अशा भांड्यांमध्ये शिजविलेले अन्न रुचकर व आरोग्यदायी असते. पण आता तांबे, पितळ, स्टीलची भांडी आली, चुलीच्या जागी गॅस सिलिंडर आला. त्‍यामुळे मातीच्या भांड्यांचे महत्त्‍व कमी होत गेले. पण आता आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्‍या आहेत. त्‍यामुळे मातीच्‍या भांड्यांना पुन्‍हा मागणी वाढू लागली आहे.

केवळ जेवणासाठीची नव्हेत तर पाणी ठेवण्यासाठी, सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या आकाराची, रंगांची मातीची भांडी तयार केली जातात. आरोसी-सासष्‍टी येथील सिमोनी रेगो (25) या युवतीने मातीची भांडी तयार करण्याच्या व्‍यवसायात क्रांती घडविली आहे.

Clay Pots
Goa Driving License: गोव्यात नवीन लायसन्स काढायचंय? जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

मोठमोठ्या बंगल्यांमध्ये, हॉटेल्‍समध्ये आणि आता रेल्वेतही मातीची भांडी वापरली जातात. पुरुमेंताचे फेस्त किंवा जत्रांमध्येही अशा भांड्याचे स्टॉल्स असतात.

मातीच्या भांड्यात जेवण शिजविल्यास कॅल्‍शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, सल्फर सारखी जीवनसत्वे शरीराला मिळतात. सिमोनी ही केवळ जेवण बनविण्यासाठीच भांडी तयार करत नाही तर टेराकोटा हस्तकलेत प्रावीण्य मिळवून मातीच्या भांड्यांना वेगवेगळे आकार व डिझाईनही करते. त्‍यामुळे लोक अशा भांड्याकडे आकर्षित होतात.

Clay Pots
Ponda Municipality Election 2023: फोंड्यात कृषीमंत्र्यांची घराणेशाही; नाईकांचे दोन्ही पुत्र निवडणूक रिंगणात!

शालेय मुलांना शिकविते कला

सिमोनीच्‍या भांड्यांचे वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सादरीकरण होऊ लागले. तिच्या कट वर्क पोटरीचे कौतुक होत आहे. ती चरख्याच्या आधारे व स्वत:च्या हाताने भांडी तयार करते. हाताने तयार केलेली भांडी जास्त मजबूत असतात असे ती सांगते.

मातीची भांडी कशी तयार करावीत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिमोनीला शाळा व महाविद्यालयांमध्ये आमंत्रित केले जाते. दुसऱ्यांना ही कला शिकवताना जास्तच आनंद होतो, असे सिमोनी सांगते.

"वालेंतिनो गास्पार यांच्‍याकडून मातीकामाचे नवनवीन धडे घेताना आपल्‍याला पहिल्‍यापासून सुरूवात करावी लागली. गास्पार आजारी होते तेव्हा त्‍यांच्‍या अंथरुणाजवळ बसून मी भांडी तयार करायची व ते मला मार्गदर्शन करायचे. गेल्या वर्षी गास्पार यांचे निधन झाले. मात्र त्‍यांनी दाखविलेल्‍या वाटेवर आपण मार्गक्रमण करीत आहे."

- सिमोनी रेगो, आरोसी-सासष्‍टी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com