Mapusa News : हजेरी कमी भरली; त्‍यामुळे परीक्षा हुकली; म्‍हापशातील ‘डीएमसी’तील प्रकार

Mapusa News : काही विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, मुळात आम्हाला स्पष्टीकरण किंवा म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही.
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा ७५ टक्के हजेरी नसलेल्या येथील डीएमसी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील एकूण ८८ विद्यार्थ्यांना सत्रपरीक्षेला बसण्यास परवानगी नाकारली. परिणामी, आज गुरुवारी या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी प्राचार्यांची भेट घेतली. एनएसयुआय, अभाविप या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारीही या ठिकाणी जमले होते.

कोण म्‍हणतो आजी वारली,

कोण म्‍हणतो कुत्रा चावला!

काही विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, मुळात आम्हाला स्पष्टीकरण किंवा म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. एकाने सांगितले, त्याची आजी वारल्याने तो काही काळ महाविद्यालयात हजर राहू शकला नाही. तर, दुसरा विद्यार्थी म्हणाला, त्याला कुत्रा चावला होता. दरम्‍यान, अशीच काही कारणे देत विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.

पूरक परीक्षा पर्याय द्यावा : अभाविप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक यांनी डीएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप आरोलकर यांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसवण्याचे विचारात घेण्यास परवानगी देण्यासंबंधी गोवा विद्यापीठाला विनंती करणार असल्याचे सांगितले.

Mapusa
Gold Rate Goa : ऐन लग्नसराईत सोने महागले; ७३ हजार तोळा, चांदीची चमकही वाढली

नाईक म्हणाले की, कॉलेजने ७५ टक्के पेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंदी घातली आहे. तसेच त्यांना नोटीस बजावली आहे की पूर्ण वर्ष महाविद्यालयात येऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागेल.

पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा विचार करावा आणि त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, अशी विनंती अभाविपने गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना सुद्धा केली आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत परंतु नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या निर्णयाशीही आम्ही सहमत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com