Goa AAP: 'सत्तेच्या' लोभापायी दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न!

Goa AAP: भाजपच्या सत्तेच्या लालसेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
Valmiki Naik
Valmiki NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Goa AAP: भाजपच्या सत्तेच्या लालसेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पाण्यातून बाहेर काढल्यावर ज्याप्रमाणे मासळी तडफडते, तशी स्थिती दिल्लीत भाजपची झाली आहे. कोट्यवधी रुपये आमदार खरेदीसाठी ठेवलेले असतानाही त्यांना आमदार फोडण्यात अपयश आले. सत्तेशिवाय भाजप राहू शकत नाही, हे त्यांनी अनेक राज्यांत दाखवून दिले आहे, भाजपमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली.

Valmiki Naik
Francisco Sardinha : गोव्यात कायदा, सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ

पक्षाच्याकार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे, संदेश तेलेकर देसाई आणि आप युवा विंगच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सिसील रॉड्रिग्ज उपस्थित होत्या. नाईक म्हणाले की, लोकशाहीला चिरडून देशातील विविध राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले आणि त्यांनी दिल्लीतही ईडी, सीबीआय या यंत्रणाचा गैरवापर करून सत्ता आणण्याचा प्रयत्न केला.

Valmiki Naik
Goa Petrol Price: जाणुन घ्या, पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर किती बदलले आहेत?

आपच्या आमदारांनी सत्तेसाठी भुकेलेला भाजपला दिल्लीत धडा शिकविला. 40 आमदारांशी त्यांनी संपर्क साधला आणि प्रत्येकाला 20 कोटी रुपये रोख देण्याचे आश्वासन दिले. एवढ्या आमदारांसाठी 800 कोटी रुपये भाजपकडे कोठून आले, असा सवाल त्यांनी केला. आप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 20 कोटी रुपये आप आमदारांसाठी मोठी रक्कम आहे, पण आमदारांनी ती ऑफर धुडकावली.

वाल्मिकी नाईक-

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी फोगटचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असा दावा केला होता. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल वेगळेच चित्र दर्शावत आहे. यामुळे गोव्याची बदनामी होत आहे. जे मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाच्या नेत्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ शकत नाही त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com